मुंबईत किफायतशीर दरात उपलब्ध होणारे म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) आपल्यालाही मिळावे अशी स्वप्न अनेक जण पाहतात. त्यासाठी मुंबईत म्हाडाची लॉटरी नेमकी कधी येते? याचा शोध लोक वारंवार घेत असतात. आता अशा लोकांसाठी म्हाडाने मोठी खुशखबर दिली आहे. आता येत्या मुंबई म्हाडा लॉटरीत (Mumbai Mhada Lottery) जबरदस्त सुविधा असलेली घरे उपलब्ध होणार आहे. या घरांच्या किंमती नेमक्या किती असतील याची माहिती देखील मिळाली आहे. चला जाणून घेऊया अपडेट..
म्हाडाकडून गोरेगावमध्ये (Goregaon) 39 मजली निवासी इमारत बांधण्यात येत आहे. ही इमारत गोरेगावमधील पहाडी परिसरातील गृहप्रकल्पामध्ये असून या गृहप्रकल्पात पहिल्यांदाच 39 मजली इमारतीचे बांधकाम होत आहे. विशेष म्हणजे या गृहप्रकल्पात मैदान, व्यायामशाळा (Gym), इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन आणि जलतरण तलाव अशा पंचतारांकीत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
येत्या ऑगस्टमध्ये घरांची सोडत
आतापर्यंत या प्रकल्पाचे बांधकाम 60 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या 39 मजली इमारतीमधील उच्च आणि मध्यम गटातील 332 घरांची सोडत पुढील वर्षात न काढता यंदाचं सोडत काढण्याचा महत्वाचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे आता येत्या ऑगस्टमध्ये काढण्यात येणार्या सोडतीत या घरांचा समावेश करण्यात येणार आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात काढल्या जाणार्या सोडतीत मागील वर्षीच्या सोडतीतील शिल्लक घरांसह नव्याने उपलब्ध झालेल्या घरांचा समावेश असणार आहेत.
मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे क्लिक करून पहा स्वस्त भागांची यादी..!
गोरेगावमधील मध्यम गटातील घराची किंमत (Goregaon Mhada Flats)
गोरेगावमधील (Goregaon) मध्यम गटातील आणि उच्च गटातील घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असण्याची शक्यता आहे. मध्यम गटातील घराची किंमत अंदाजे 80 लाख रुपयांपर्यंत असू शकते आणि उच्च गटाच्या घराची किंमत अंदाजे सव्वा कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.