म्हाडा कोंकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांची लॉटरी, पहा कधी होणार घराचे स्वप्न पूर्ण?

मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या (Mhada Konkan Lottery) 5 हजार 311 एवढ्या घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडाला अजूनपर्यंत मुहूर्त सापडलेला नाहीये. काही प्रशासकीय कारणांमुळे 13 डिसेंबरला होणारी लॉटरी म्हाडाकडून पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लॉटरी काढली जाईल, असे वाटत होते. पण डिसेंबर महिना उलटून नवीन वर्ष सुरू झाले असले तरी अजूनपर्यंत कोकण मंडळाच्या 5 हजार 311 घरांच्या लॉटरीची तारीख अजूनपर्यंत निश्चित झाली नाहीये. त्यामूळे ही लॉटरी नेमकी कधी काढणार? अस प्रश्न निर्माण झाला आहे. पण आता ही लॉटरी लवकरच काढण्याची शक्यता आहे.

येथे वाचा – न्यू इअर धमाका ऑफर! या बँकेकडून घ्या सर्वात स्वस्त होम लोन, ही संधी सोडू नका..!

पहा किती आहेत घरे ? (Mhada Konkan Lottery)

(1) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतची 1010 एवढी घरे
(2) सर्वसमावेशक योजनेंतर्गतची 919 एवढी घरे
(3) एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत असलेली 1037 एवढी घरे
(4) टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनकरिता 64 एवढी घरे

या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 15 सप्टेंबरला करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार या लॉटरीसाठी एकूण 30 हजार 687 एवढे अर्ज प्राप्त झाले होते, तर अनामत रक्कम भरलेले अर्ज 24 हजार 303 एवढे होते.

येथे वाचा – आता म्हाडाकडून दुकानांचा लिलाव; स्वस्तात दुकान घेण्याची संधी, पहा मुंबईत कुठे आहेत म्हाडाची दुकाने?

कोकण मंडळाच्या या लॉटरीची घरे ठाणे शहर तसेच जिल्हा (1 bhk flat Thane), पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असून या लॉटरीची तारीख अर्जदारांना त्यांच्या मोबाइलवरती SMS द्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबत गुरुवार रोजी होत असलेल्या बैठकीमध्ये लॉटरीची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

तयारीला लागा; आता पुन्हा एकदा स्वस्तात म्हाडाचे घर घेण्याची संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment