मोठी बातमी! अखेर म्हाडाच्या 5311 घरांची लॉटरी यादिवशी निघणार; ही तारीख आली समोर..!

MHADA Konkan Lottery : आता सर्वसामान्य लोकांना तसेच कोकणवासीयांना लवकरच म्हाडाचे घर (Mhada Flats) मिळणार असून त्यांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. याचे कारण म्हणजे आता म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीला (Mhada Konkan Lottery) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता ही सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात काढली जाणार आहे. लोक बर्‍याच दिवसांपासून या लॉटरीची प्रतीक्षा करत होते. पण अखेर या लॉटरीला मुहूर्त मिळाल्याने स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ही सोडत कधी निघणार? सोडत काढण्याची तारीख नेमकी काय आहे? याची माहिती जाणून घेऊया. (Lottery of 5311 houses of MHADA will be released on this day)..

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

आता यादिवशी म्हाडाच्या 5 हजार 311 घरांची सोडत (Mhada Konkan Lottery)

सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या तब्बल 5 हजार 311 एवढ्या घरांच्या लॉटरीकरिता म्हाडाला आतापर्यंत मुहूर्त मिळालेला नव्हता. गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कोकण मंडळाच्या घरांची ही लॉटरी काढली जाणार होती. पण अनेक वेळा प्रशासकीय कारणांमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती. पण आता कोकण मंडळाच्या या सोडतीला मुहूर्त मिळाला असून 24 फेब्रुवारी 2024 रोजी ही सोडत निघणार आहे. त्यामुळे आता तब्बल 24 हजार अर्जदारांच्या सोडतीची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

Leave a Comment