मुंबईकरांनो! संधी सोडू नका; सिडकोची हजारो घरांची लॉटरी जाहीर, पहा कुठे किती घरे?

CIDCO Lottery 2024 :  मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या परिसरामध्ये आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अनेकांनी पाहिलेले असते. मुंबईत घर (2 bhk flats Mumbai) घेणे भविष्यात खूपच फायद्याचे ठरणार असं अनेक जण बोलतात आणि हे अगदी बरोबर देखील आहे. कारण मुंबईत रोजगार तसेच सर्व सोईसुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे येथील प्रॉपर्टीचे भाव भविष्यात सारखेच वाढत राहणार हे नक्की आहे. म्हणूनच मुंबईत घर (2 BHK flats Mumbai) खरेदी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. आता मुंबईत घर खरेदी करण्याची इच्छा असणार्‍या सामान्यांना मुंबईत परडणाऱ्या दरात घर (Affordable Flats Mumbai) मिळावे यासाठी म्हाडा आणि सिडकोकडून विविध योजना आणल्या जात आहे. आता सिडकोकडून महागृहनिर्माण योजना 2024 जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबईकरांनो! आता मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत उपलब्ध होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

प्रजासत्ताक दिनाचा शुभमुहूर्त साधून काढण्यात आलेल्या या लॉटरीमध्ये एकूण 3322 एवढ्या घरांचा (Cidco Flats Mumbai) समावेश करण्यात आला आहे. या लॉटरीच्या महत्त्वाच्या तारखा आणि कुठे किती घरे उपलब्ध आहे? याची माहिती जाणून घेऊया.. सिडकोच्या या योजनेमध्ये एकूण 3322 एवढी घरे आहेत. यातील 312 एवढी घरे आर्थिक दुर्बल घटकांकरिता आहेत आणि उर्वरित असलेली 3010 एवढी घरे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

सिडकोच्या या लॉटरी संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी https://lottery.cidcoindia.com या वेबसाइटला नक्कीच भेट द्या. तसेच यावर तुम्हाला अर्ज कसा करायचा? घरांची किंमत किती? आणि घरे कुठे व किती आहे? उत्पन्न मर्यादा काय? तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे? याची संपूर्ण माहिती देखील माहितीपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. या लॉटरीविषयी अधिकृत सूचना पाहण्याकरिता lottery.cidcoindia.com सिडकोच्या या वेबसाईला पाहू शकता.

मुंबईत स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवा; मिळेल खूपच स्वस्तात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

लॉटरीच्या महत्त्वाच्या तारखा

(1) सोडतीसाठी 26 जानेवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (2) ऑनलाईन अर्ज नोंदणी 26 जानेवारी 2024 पासून करता येणार. (3) ऑनलाईन अर्जाकरिता नोंदणी समाप्तीची तारीख 26 मार्च 2024. (4) सोडतीकरिता ऑनलाईन अर्जाची सुरुवात तारीख 30 जानेवारी 2024. (5) सोडतीकरिता ऑनलाईन अर्जाची समाप्ती तारीख 27 मार्च 2024. (6) ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात तारीख 31 जानेवारी 2024. (7) ऑनलाईन पेमेंटसाठी अंतिम तारीख 28 मार्च 2024. (8) NEFT व RTGS चलन स्वीकृती तारीख 28 मार्च 2024. (9) सोडतीकरिता स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी तारीख 5 एप्रिल 2024. (10) सोडतीकरिता स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी तारीख 10 एप्रिल 2024. (11) सोडत काढण्याची तारीख 19 एप्रिल 2024

मुंबईकरांनो! आता मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत उपलब्ध होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

मुंबईत कुठे किती घरे उपलब्ध? (Cidco Flats Mumbai)

(1) सेक्टर 11, प्लॉट नंर 1, द्रोणागिरी येथे 132 एवढी घरे. (2) सेक्टर 12, प्लॉट नं. 63, द्रोणागिरी येथे 149 एवढी घरे. (3) सेक्टर 12, प्लॉट नं. 68, द्रोणागिरी येथे 154 एवढी घरे. (4) सेक्टर 21, तळोजा येथे 142 एवढी घरे. (5) सेक्टर 22, तळोजा येथे 87 एवढी घरे. (6) सेक्टर 27, तळोजा येथे 355 एवढी घरे. (7) सेक्टर 34, प्लॉट नं. 1, तळोजा येथे 403 एवढी घरे. (8) सेक्टर 34, प्लॉट नं. 6, तळोजा येथे 575 एवढी घरे. (9) सेक्टर 36, प्लॉट नं. 1, तळोजा येथे 637 एवढी घरे. (10) सेक्टर 36, प्लॉट नं. 2, तळोजा येथे 560 एवढी घरे. (11) सेक्टर 37, तळोजा येथे 128 एवढी घरे.. अशी एकूण 3322 एवढी घरे आहेत..

1 thought on “मुंबईकरांनो! संधी सोडू नका; सिडकोची हजारो घरांची लॉटरी जाहीर, पहा कुठे किती घरे?”

Leave a Comment