मुंबईकरांनो! संधी सोडू नका; ज्यांच्याकडे हक्काचं घर नाही अशा लोकांसाठी अल्पदरात घरं, याठिकाणी 25 हजार घरांची लॉटरी..!

2 bhk flat in mumbai : बदलापूरजवळ असलेल्या वांगणी रेल्वे स्टेशनहून फक्त काही अंतरावरच म्हाडा (Mhada) आणि सीडीपीकडून तब्बल 25 हजार एवढ्या घरांचा मोठा प्रकल्प (2 bhk flat in Mumbai) उभारला जात असून पहिल्या टप्यामध्ये 2 हजार घरांसाठी म्हाडाद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या नागरिकांकडे आपले हक्काचे घर नाही, अशा सामान्य नागरिकांना अल्प दरामध्ये ही घरे (2 bhk flat in mumbai) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

म्हाडा आणि चड्ढा डेव्हलपर्स अॅण्ड प्रमोटर्स यांच्याकडून वांगणी याठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) याअंतर्गत चढ्ढा रेसिडेन्सी या नावाने गृहसंकुल उभारले जात आहे. या घरांसाठी 20 जानेवारी पर्यन्त संगणकीकृत अर्ज सादर करता येणार आहेत.

अरे वा! नव्या वर्षात म्हाडाची 1600 घरांसाठी लॉटरी; जानेवारीत होणार जाहिरात प्रसिद्ध, येथे क्लिक करून पहा कुठे असणार घरे?

हा प्रकल्प नवी मुंबई विमानतळाहून (Navi Mumbai Airport) वडोदरा- मुंबई जेएनपीटी एक्स्प्रेस-वेने फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि वांगणी स्टेशनहून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे बदलापूर बारवी धरण आणि मलंगगड यांसारख्या पर्यटन स्थळांजवळ तसेच माथेरान हिल स्टेशनहून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. या घरांना खरेदी करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

ठाणे जिल्ह्यामधील वांगणी याठिकाणी 155 एकर एवढ्या जागेवरती सात मजले असलेल्या 133 एवढ्या इमारतीचा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 25 हजार सदनिकांसह पहिल्या टप्प्यामध्ये 8 हजार 200 एवढ्या सदनिकांचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पात असलेल्या एका सदनिकेची किमत जवळपास 26 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.

काय सांगता! आता मुंबईतील या 30 हजार लोकांना मिळणार म्हाडाची घरे, येथे क्लिक करून पहा बातमी..

आणि महत्वाचं म्हणजे याठिकाणी 24 तास पाणी पुरवठ्याची व्यवस्था असणार आहे. त्यात अजून विशेष आकर्षण असलेल्या सुविधा जसे की शाळा, बससेवा, हॉस्पिटल, भाजी मार्केट, मॉल, शिव मंदिर, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, खेळायचे मैदान, 24 तास सेक्युरीटी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अजून बर्‍याच सुविधा उपलब्ध असणार आहेत.

2 thoughts on “मुंबईकरांनो! संधी सोडू नका; ज्यांच्याकडे हक्काचं घर नाही अशा लोकांसाठी अल्पदरात घरं, याठिकाणी 25 हजार घरांची लॉटरी..!”

Leave a Comment