म्हाडाच्या 5863 घरांच्या सोडतीत मोठा बदल; पहा म्हाडाच्या लॉटरीसंदर्भात महत्वाची बातमी..!

Mhada Lottery Pune :  म्हाडाचे घरं परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने लोक म्हाडाच्या सोडतीची प्रतीक्षा करतात. कारण मुंबई – पुणे या शहरांमध्ये घरांच्या किंमती प्रचंड वाढल्याने घर (1 bhk flat Pune) घेण्यासाठी लोकांना खासगी बिल्डरला खूपच पैसा द्यावा लागतो. अनेकदा सामन्यांसाठी एवढा पैसा जमा करणे शक्य होत नाही. सध्या मुंबई – पुण्यात वन बीएचके घरेही (1 bhk flat Mumbai) महागली आहे. त्यामुळे लोक परवडणाऱ्या दरात मिळणार्‍या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायला उत्सुक असतात. तुम्हाला देखील म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. घरांसाठी अर्ज करण्यासंदर्भात म्हाडाचे एक महत्वाचे अपडेट आले आहे.

म्हाडाच्या पुणे (Mhada Pune) मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर याठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेंतर्गत (Housing Scheme) उभारण्यात आलेल्या 5863 एवढ्या घरांच्या विक्रीकरिता 24 नोव्हेंबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली संगणकीय सोडत काही प्रशासकीय कारणामूळे पुढे ढकलली गेली आहे. आता संबंधित अर्जदारांना सोडतीची नवीन तारीख त्यांच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून कळविण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

या पुणे मंडळाच्या सोडतीचा ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 05 सप्टेंबरला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या सोडतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आतापर्यंत सुमारे 60,000 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता करता यावी यासाठी वाढीव मुदत मिळावी म्हणून नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार तसेच नागरिकांना सुविधा मिळावी याकरिता मंडळाकडून सोडतीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीमध्ये पुणे जिल्ह्यामधील 5425 एवढ्या सदनिका तसेच सोलापूर जिल्ह्यामधील 69 सदनिका तर सांगली जिल्ह्यामधील 32 व कोल्हापूर जिल्ह्यामधील 337 एवढ्या सदनिका विक्रीकरिता उपलब्ध आहेत. या सोडतीमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेमधील (Mhada Housing Scheme) 403 एवढ्या सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) 431 एवढ्या सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या 2584 एवढ्या सदनिका तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत असलेल्या 2445 एवढ्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

दरम्यान, म्हाडाद्वारे राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागीय मंडळांकडून सदनिकांची बांधणी करण्यात येते. संपूर्ण राज्यामध्ये म्हाडाच्या मालकीच्या असलेल्या जवळपास 12 हजार एवढ्या सदनिकांची विक्री होऊ शकलेली नाही. म्हणून म्हाडाकडून आता या घरांच्या विक्रीसाठी नव्यानं योजना बनवण्यात येत असून यात दर कमी करणे तसेच मोठ्या प्रमाणात घरं खरेदी करणाऱ्यांना सुद्धा या सदनिका विकल्या जाऊ शकतात. यासंदर्भातील अंतिम योजना म्हाडाकडून बनवण्यात येणार आहे.

राज्यामध्ये पुणे विभागात म्हाडाच्या सदनिकांची (Mhada Flats) विक्री कमी झाली असल्याची माहिती आहे. जर या सदनिकांची विक्री झाली तर मोठ्या प्रमाणात म्हाडाकडे आर्थिक निधी उपलब्ध होऊ शकतो. हे लक्षात घेऊन म्हाडाद्वारे पुढील काळात यासंदर्भात योजना आणली जाईल ज्यामुळे स्वस्तात घरं उपलब्ध करुन दिली जातील.

Leave a Comment