मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत मोठा बदल..!

MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या माध्यमातून ठाणे शहर तसेच ठाणे जिल्हा आणि पालघर, रायगड व सिंधुदुर्ग येथील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 5311 एवढ्या सदनिकांसाठी लॉटरी जाहीर केली होती. म्हाडाच्या या सोडतीला (MHADA Lottery 2023) खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच म्हाडाद्वारे अर्जविक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला एका महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता या मुदतवाढीनुसार सोडतीकरिता 18 नोव्हेंबर या तारखेपर्यंत अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहे. आणि ही सोडत 13 डिसेंबरला काढली जाणार आहे. 

म्हाडा कोकण मंडळाकडून काढण्यात आलेल्या 5311 एवढ्या घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृतीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीमध्ये सहभागी होणाऱ्या अर्जांची संख्या 10 हजारांचा टप्पादेखील गाठण्याची शक्यता नसल्याने कोकण मंडळाद्वारे अर्जविक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला अजून एका महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मुदतवाढीनुसार इच्छुक असलेल्या लोकांना 18 नोव्हेंबरपर्यंत RTGS आणि NEFT द्वारे अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करता येणार आहे. परिणामी आता 7 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत रद्द करण्यात आली असून आता ही सोडत 13 डिसेंबरला काढण्यात येणार आहे.

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

कोकण मंडळाच्या मे मधील सोडतीतील शिल्लक आणि इतर उपलब्ध असलेल्या घरांसाठी मागील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी 15 सप्टेंबर या तारखेपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू करण्यात आलेली आहे. RTGS आणि NEFT द्वारे अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर ही होती. पण अनामत रकमेसह सादर झालेल्या अर्जांची संख्या 10 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता दिसत नाही. म्हणूनच कोकण मंडळाकडून अर्जविक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे या प्रस्तावास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

घरं विकण्याकरिता म्हाडाची कसरत (Mhada Flats)

पंतप्रधान आवास योजनेमधील तसेच विरार-बोळिंज याठिकाणी असलेल्या मंडळाच्या घरांची विक्री होत नसल्यामूळे म्हाडा प्राधिकरणाची चिंता वाढलेली आहे. आणि आर्थिक अडचणी देखील निर्माण होत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मंडळाकडून सोडतीसाठी मिळालेल्या मुदतवाढीच्या कालावधीमध्ये घरं विकण्यासाठी विविध योजना आखण्यात येणार आहे. सोडती संदर्भात जनजागृती केली जाणार आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून सोडतीची जाहिरात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

Leave a Comment