खुशखबर! आता मुंबईत अनेकांना मिळणार म्हाडा-सिडकोचे घर, या निर्णयामुळे घराचे स्वप्न पूर्ण होणार..!

Mhada, Cidco Housing Lottery: आणखी एक पाऊल स्वप्न साकार करण्याच्या दिशेने! म्हाडा आणि सिडकोची घरे परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येणार. पहा सविस्तर रिपोर्ट…

म्हाडा आणि सिडकोच्या नावाने राबविण्यात आलेले गृहनिर्माण प्रकल्प हक्काच्या आणि चांगल्या घराच्या शोधात असलेल्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. ही घरे शहर किंवा उपनगरी भागातील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत आणि कर्जाचा बोजा न ठेवता विविध सुविधांसह उपलब्ध करून दिली जातात. अशा घराच्या शोधात असलेल्यांसाठी आता म्हाडा आणि सिडकोकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत, ज्याचा फायदा घर खरेदी करू इच्छिणाऱ्या अनेकांना होणार आहे.

म्हाडा आता सोडतीत समाविष्ट असलेली आणि विक्रीशिवाय उपलब्ध असणारी घरे उमेदवारांना मास बुकिंगद्वारे उपलब्ध करून देत आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या पावलावर पाऊल ठेवत सिडकोनेही विविध प्रकल्पांतील सोडती शिवाय उर्वरित घरे विकण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परिस्थितीचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे सिडकोच्या महासंचालकांनी एका नामांकित वृत्त समूहाशी बोलताना सांगितले.

मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे क्लिक करून पहा स्वस्त भागांची यादी..!

घर खरेदीवर सूट?

विरारमधील म्हाडा कोकण मंडळात सुमारे 5000 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत ज्या सरकारी किंवा खाजगी संस्था एकाच वेळी 100 घरांची नोंदणी करू शकतात त्यांना घरांच्या किमतीत 15 टक्के सवलत मिळणार आहे. याच पार्श्भूमीवर म्हाडा प्रमाणेच या प्रकल्पातील उर्वरित घरे विकण्याची तयारी सिडकोने दाखवली आहे.

गेल्या 4 वर्षात सिडकोने नवी मुंबईतील (Navi Mumbai) विविध भागात 25 हजारांहून अधिक घरे बांधली आहेत. मात्र, अजूनपर्यंत 8 हजार घरांची (Mhada Flats) विक्री झालेली नाही. भविष्यातील प्रकल्पांसाठी सिडकोने विविध उत्पन्न गटांशी करार करून 86,000 घरांचे बांधकाम हाती घेतले असून, त्यापैकी 40,000 घरे बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत, परंतु या सिडकोच्या घरांना मिळणारा प्रतिसाद काहीसा कमी झाला असल्याचं चित्र दिसून येत आहे.

Leave a Comment