मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ म्हाडाचे 2 BHK फ्लॅट खरेदी करता येणार; पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

MHADA 2 BHK Flats Mumbai : मुंबईत रेल्वे स्टेशन, रुग्णालय आणि भाजी मंडईजवळ आपल्याला हक्काचे घर मिळावे असं अनेक जण स्वप्न पाहतात. या सुविधा घराजवळ असतील तर माणसाला आरामदायकपणे जीवन जगता येतं. त्यामूळे घर घेताना अशा लोकेशनचा शोध घेतला जातो. अशा परिस्थितीत आता मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे 2 बीएचके घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. म्हाडाचे घर परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने कमी किमतीत मोक्याच्या ठिकाणी घर घेता येणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबईत नेमका कुठे साकारला जाणार याची माहिती जाणून घेऊया..

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

मागील काही वर्षांमध्ये मुंबईतील मूळ रहिवाशी असलेल्या अनेकांनी आपला मुक्काम उपनगरांकडे वळवला असल्याचं ऐकायला मिळतंय. त्यामुळे सध्या मुंबईचा मूळ रहिवासी राहिलाय कुठे? असा प्रश्न बर्‍याचदा उपस्थित करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई शहरात दाट लोकवस्ती वाढली आहे. असं असलं तरी मुंबईत प्रत्येकाला मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच विविध सुविधा असलेल्या ठिकाणी घर घ्यायचं आहे. पण आता म्हाडा एका नव्या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना मोक्याच्या ठिकाणी 2 बीएचके फ्लॅट (2 BHK Flats) उपलब्ध करून देणार आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

म्हाडा देणार 2 बीएचके फ्लॅट (Mhada 2 BHK Flats Mumbai)

आता म्हाडाच्या मदतीमुळे मुंबईत 2 बीएचके घर (2 BHK Flats Mumbai) घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण, आता एका नव्या योजनेअंतर्गत काळाचौकी येथे असलेल्या अभ्युदय नगर (काळाचौकी) वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या म्हाडाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

म्हाडाची किती घरं उपलब्ध होणार? (Mhada Flats Mumbai)

म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार साधारण 33 एकर एवढ्या भूखंडावर काळाचौकीमधील प्रकल्पावर सध्या 49 एवढ्या इमारती आहे आणि या इमारतींमधील लोकसंख्या 3350 एवढी आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या पुनर्विकासातून म्हाडाला तब्बल 10 हजारांपेक्षा जास्त घरं मिळणार आहे. त्यामुळे आता मुंबईत अनेकांना मोक्याच्या ठिकाणी हक्काचं घर घेता येणार आहे. रेल्वे स्टेशन, भाजी बाजार, रुग्णालय तसेच मेट्रो अशा बर्‍याच सुविधा हाकेच्या अंतरावर असलेल्या या भागामध्ये 2 बीएचकेची घरं (2 BHK Flats Mumbai) म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

3 thoughts on “मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ म्हाडाचे 2 BHK फ्लॅट खरेदी करता येणार; पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!”

Leave a Comment