Mhada Flat Mumbai : आजकाल हक्काचे घर किती महत्वाचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. घर भाड्यात वाढ झाल्याने पुणे तसेच मुंबई शहरात स्वतःचे घर (1 bhk flat Mumbai) असणे खूपच गरजेचे झाले आहे. त्यामुळे प्रतेक जण बजेटमध्ये घर (Budget Friendly Home Mumbai) शोधत असतो. आता परवडेल अशा दरात म्हाडा तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहे. पण हे घर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे खूप महत्वाचे असते.
Mhada Flat Mumbai
गिरणीत काम करत होते असा पुरावा म्हणून अपेक्षित असणार्या 13 पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीनुसार म्हाडाच्या वेबसाइटवर किंवा ॲपच्या माध्यमातून अपलोड केली असल्यास त्यांना प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे (Ducuments) जमा करण्याची गरज नाही. ज्या गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर न करता ऑफलाइन पद्धतीने सादर करायची आहेत त्यांनी समाज मंदिर हॉल याठिकाणी कागदपत्रे जमा करावे. ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून आतापर्यंत 900 अर्ज जमा झाले आहेत, अशी माहिती म्हाडाकडून मिळाली आहे.
मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!
सरकार त्या 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगारांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत. म्हाडाद्वारे 58 बंद गिरण्यांतील या अगोदर झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेले अशे 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगारांसाठी आयोजित असलेल्या अभियानास अर्जदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान म्हाडा कार्यालयाजवळ असलेल्या एम.आय.जी. क्रिकेट ग्राउंडजवळ, गांधीनगर, वांद्रे (पूर्व) याठिकाणी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!
ही कागदपत्रे गरजेची (Necessary documents)
ही समोरील कागदपत्रे आवश्यक आहे (1) गिरणी कामगाराचे ओळख पत्र, (2) हजेरी पत्र, (3) तिकीट नंबरची प्रत, (4) सर्व्हिस प्रमाणपत्र, (5) लाल पास, (6) प्रोव्हिडंट फंड क्रमांक, (7) ईएसआयसी क्रमांक, (8) मिल प्रमाणपत्र प्रत, (9) लीव्ह रजिस्टर प्रत, (10) उपदान प्रदान आदेश, (11) भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, (12) पगार पावती, (13) आधार कार्ड तसेच इतर तत्सम कागदपत्रे
आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर; येथे क्लिक करून पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..
गिरणी कामगार आणि त्यांचे वारस म्हाडा मुख्यालयामध्ये येत आहे. पण कागदपत्रे सोईनुसार ऑनलाइन तसेच ऑफलाइन याद्वारे कोणत्याही एका पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध असलेल्या गिरणी कामगारांना घेऊन प्रवास करत म्हाडा कार्यालयामध्ये येण्यापेक्षा कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा. अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली..