म्हाडाचं सर्वात मोठं घर डोंबिवलीत; अर्ध्या किंमतीत घर मिळणार? पहा बातमी..

Mhada Flat Dombivali : मुंबईमधील घरे दिवसेंदिवस महाग होत आहे त्यामुळे मुंबई शहराच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन प्रकल्प (2 bhk flat mumbai thane) येऊ लागले आहेत आणि त्याला लोक अशा प्रकल्पांना पसंती देत असून त्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होत आहे. असाच एक महत्त्वाचा परिसर म्हणून पुढे आला आहे तो म्हणजे कल्याण शिळफाटा रोड आणि महत्त्वाचं म्हणजे याठिकाणी म्हाडाचे नवीन प्रकल्प (Mhada Flat) राबविण्यात येत आहे. जर तुम्हाला बजेटमध्ये असलेले आणि मोठे घर घ्यायचे असेल तर हा प्रकल्प तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. या बातमीत आपण डोंबिवलीमधील नांदिवली परिसरामधील उषाकिरण एनक्लेव प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. या परिसरामधील प्रॉपर्टीच्या किंमती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. (2 bhk flat in mumbai).

मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

या प्रकप्लामध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता 16 घरे उपलब्ध असून मध्यम उत्पन्न गटासाठी फक्त 2 घरे उपलब्ध आहे. बर्‍याच लोकांनी प्रश्न उपस्थित केला होता की मध्यम गटासाठी म्हाडाची घरे (Mhada Flats) कुठे उपलब्ध आहेत? तर ही घरे डोंबिवली व टिटवाळा याठिकाणी उपलब्ध आहे. (ready to move flat in mumbai).

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

या प्रकल्पामध्ये 2 bhk चा फ्लॅट (2 bhk flat) 71 स्क्वेअर मीटर एवढा आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट म्हाडा लॉटरीमधील सर्वात मोठा फ्लॅट असल्याची चर्चा होत आहे. या घरांचे सॅम्पल फ्लॅट रेडी करण्यात आले असून तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ही घरे पाहू शकणार आहेत. उषाकिरण एन्क्लेव्ह हे डोंबिवलीच्या (Dombivali) पूर्वेकडील खूपच मागणी असलेल्या निवासी संकुलांपैकी एक आहे.. हे डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून फक्त 3 किमी अंतरावर असून कल्याण शिळफाटा रस्त्यापासून फक्त 0.5 किमी एवढ्या अंतरावर आहे.

आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर; येथे क्लिक करून पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..

हा घराचा प्रकल्प शंखेश्वर नगरच्या मागे, नांदिवली रोड याठिकाणी आहे, ज्या लोकांना विशेष राहण्याचा खास अनुभव घ्यायचा असेल त्यांच्यासाठी याठिकाणी वेगवेगळ्या सुविधा आणि वैशिष्ट्ये आहेत. टॉवरने मालवाहू लिफ्टसोबतच दुहेरी असलेली प्रवासी लिफ्ट आणि सुलभ तसेच सुरक्षित प्रवेशासाठी दोन जिने आणि रहिवाशांची गोपनीयता राखण्यासाठी इमारतीचा प्रत्येक फ्लॅट जवळ असलेल्या इमारतींपासून 40 फूट अंतरावर ठेवण्यात आला आहे.

या प्रकप्लाचा सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा

Leave a Comment