म्हाडाचा चावी वाटप कार्यक्रम; एवढ्या लोकांना मिळाली म्हाडाची घरे, पहा बातमी..!

Mhada Flat Mumbai : हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्येक जण पाहतो. जर स्वतः चे हक्काचे घर नसेल तर कुटुंब उघड्यावर पडल्यासारखे वाटते, त्यामुळे घर किती महत्वाचे आहे हे तेव्हा समजते. आता पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी घराचे (1 BHK Flat Mumbai) हे स्वप्न म्हाडा पूर्ण करत आहे. अलीकडेच म्हाडाचा चावी वाटप कार्यक्रम पार पडला आहे. त्यात बर्‍याच जणांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात गृहप्रवेश होत असल्याने आनंदात दुप्पट भर पडली आहे. चला तर मग जाणून घेऊया यासंदर्भात संपूर्ण माहिती. (1 BHK flat Mumbai)..

बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांकरिता वर्ष 2020 मध्ये म्हाडाकडून ज्या घरांच्या सोडती (Mhada Housing Lottery) काढल्या होत्या, त्यातील पात्र ठरलेल्या 109 एवढ्या गिरणी कामगार तसेच वारस यांना पाचव्या टप्प्यांत घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहे. हा कार्यक्रम म्हाडाच्या वांद्रे याठिकाणी असलेल्या मुख्यालयामध्ये पार पडला.

आता करा म्हाडाच्या स्वस्त घरासाठी अर्ज; येथे क्लिक करून पहा अर्ज प्रक्रिया?

हा चावी वाटपाचा कार्यक्रम म्हाडा व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे आणि आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच उपमुख्य अधिकारी योगेश महाजन हे उपस्थित होते.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

आमदार सुनील राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 2020 या वर्षी गिरणी कामगारांकरिता काढण्यात आलेल्या सोडतीमधील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किमतीचा (Sale price of flats), मुद्रांक शुल्क भरलेल्या 987 एवढ्या गिरणी कामगारांना 15 जुलैपासून चार टप्प्यांमध्ये घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले असून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या हक्काच्या घरामध्ये प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार तसेच वारस यांना मिळाली आहे. मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्याद्वारे सोडतीमधील उर्वरित गिरणी कामगार तसेच वारस यांची पात्रता निश्चित करणे वेगाने सुरू असून त्यांना लवकरात लवकर सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आता घर घेताना पैशाची चिंता सोडा; या पाच बॅंकांमध्ये मिळत आहे स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..!

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळाद्वारे 58 बंद व आजारी गिरण्यातील एकूण 1 लाख 50 हजार 484 एवढ्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी अभियान मुख्यालयामधील पहिला मजला, कक्ष क्रमांक 240, पणन कक्ष याठिकाणी सुरू करण्यात आले आहे.

संबधित कागदपत्रे (Ducuments) सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध आहे. कामगार तसेच वारसांनी म्हाडा मुख्यालयामध्ये येऊन प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याव्यतिरिक्त www.millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा कागदपत्रे अपलोड करू शकतात. आणि मोबाइलमध्ये देखील मिल वर्कर्स एलिजिबिलिटी या नावाने याचे ॲप उपलब्ध आहे.

संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment