काय सांगता! थेट आमदाराने म्हाडाची घरे केली परत, पहा यामागचे खरे कारण..!

Mhada Flat Mumbai : मुंबई मंडळाकडून 14 ऑगस्ट रोजी 4 हजार 82 एवढ्या घरांसाठी सोडत (Mumbai Mhada Lottery) काढली होती. या घरांसाठी काही लोकप्रतिनिधींनी देखील आरक्षित प्रवर्गामधून अर्ज केले होते. यामध्ये भागवत कराड आणि कुचे यांच्यासह अजून इतर आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. कराड आणि कुचे यांनी ताडदेवमधील (Tardeo Mumbai) क्रिसेन्ट टॉवरमधील साडेसात कोटी रुपये किंमत असलेल्या घरासाठी अर्ज केला होता. लोकप्रतिनिधी असलेल्या प्रवर्गामध्ये एक घर होते आणि त्यासाठी दोन अर्ज आले होते. सोडतीमध्ये कुचे हे या घरासाठी (Mhada Flat Mumbai) विजेते ठरले आणि कराड प्रतीक्षा यादीवरील विजेते ठरले होते. दरम्यान ताडदेवमध्येच असलेल्या साडेसात कोटींच्या अनुसूचित जाती प्रवर्गामधील घरासाठी देखील कुचे हे विजेते ठरले होते.

सोडत झाल्यानंतर मंडळाकडून विजेत्यांना ऑनलाइन स्वीकृती पत्र पाठवण्यात आले असून हे घर घेणार की परत करणार असे या पत्राद्वारे 27 ऑगस्टपर्यंत विजेत्यांना मंडळाला कळवावे लागणार आहे. या प्रक्रियेनुसार कुचे यांनी ताडदेवमधील दोन्ही घरे गुरुवार रोजी परत केल्याची माहिती लोकसत्ताला कळवली. म्हाडाची घरे (Mhada Flats) महाग असून ती सर्वसामान्यांना परवडत नाही असे सांगून त्यांनी किमतीसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असल्याच्या तक्रारी येत असतानाच सोडतीमधील महागडी घरे आमदारांना देखील परवडत नसल्याचे दिसत आहे. ताडदेव परिसरातील साडेसात कोटी रुपयांच्या 2 घरांसाठी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे हे विजेते ठरले होते, पण ही घरे परवडत नसल्याने त्यांनी ही दोन्ही घरे परत केली आहे. आता प्रतीक्षा यादीमध्ये असलेले विजेते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना या घराची संधी आहे.

Leave a Comment