खुशखबर! स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; याठिकाणी उपलब्ध होणार 5 हजार स्वस्त घरे..!

Mhada Flat : पुणे शहरामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील इंजिनीयर मोठ्या प्रमाणात जॉब करतात. या कारणामुळे पुणे शहरामध्ये घरांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. मागणी खूप असल्यामुळे घराचे दर देखील खूप वाढतात. पण आता खुशखबर अशी की पुणे शहरामध्ये कमी किंमतीत म्हाडाचे घर (Mhada Flat Pune) घेण्याची संधी मिळणार आहे. पुण्यात स्वस्तात घर खरेदी करण्याची ही संधी म्हाडाच्या पुणे मंडळाकडून मिळणार आहे. म्हाडा तब्बल 5 हजार घराची सोडत (House Lottery Pune) काढणार आहे. नेमकी ही प्रक्रिया कधीपासून सुरु होणार? याबाबत माहिती मिळाली आहे. अलीकडेच म्हाडाच्या सोडतीत भाजप आमदाराला मुंबईमध्ये म्हाडाचे घर (Mhada Flat Mumbai) लागले. त्याची सगळीकडे चर्चा केली जात आहे. आता पुण्यात देखील स्वस्तात घर खरेदी करता येणार आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..

कधीपासून सुरू होणार प्रक्रिया?

म्हाडाच्या मुंबई मंडळाने अलीकडेच 4 हजार 82 घरांची लॉटरी काढली होती. पुणे मंडळाची प्रक्रिया देखील लवकरच सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

मुंबई म्हाडा लॉटरीमध्ये (Mumbai Mhada Lottery) जालना जिल्ह्यामधील बदनापूरचे भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुचे यांना देखील घर मिळाले आहे. दहा कोटी रुपये किमतीचे घर म्हाडाकडून त्यांना फक्त 7 कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपये एवढ्या किमतीला मिळाले. म्हाडाच्या मुंबई लॉटरीनंतर आता पुण्यात देखील 5 हजार एवढ्या घरांची सोडत काढण्यात येत आहे. आता या लॉटरी संदर्भात 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि यासंदर्भातील प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

गटानुसार करू शकता अर्ज

पुणे म्हाडाकरिता विविध गट असणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम तसेच उच्च असे गट असणार आहे. पुणे शहर तसेच सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसाठी देखील सोडत काढण्यात येणार आहे, अशी महत्वाची माहिती पुणे म्हाडा मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली आहे.

म्हाडा देते कमी किंमतीत घरे (Mhada Cheap Flats)

म्हाडाद्वारे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होते कारण म्हाडा कमी किंमतीत घरे उपलब्ध करून देते. स्वस्तात घर मिळवण्यासाठी लाखो जण यासाठी अर्ज करत असतात. आता पुण्यात देखील स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Leave a Comment