मुंबईत म्हाडाची घरे झाली स्वस्त! म्हाडा प्राधिकरणाने घेतला मोठा निर्णय; आता घराचे स्वप्न होईल साकार..!

Mhada Flats Mumbai : म्हाडा अंतर्गत कोकण मंडळाची बाळकुममध्ये 2018 साली सोडत झाली. अशावेळी मध्यम गटामधील 194 घरांच्या किमतीमध्ये मंडळाने तब्बल सोळा लाखांची वाढ केली (2 bhk flat in mumbai). अशा परिस्थितीमध्ये या सोडती मधील 125 विजेत्यांसोबतच 2005 मध्ये झालेल्या एका योजनेमधील 69 लाभार्थी व्यक्तींवर मोठा आर्थिक भर पडला आहे. परंतु आता म्हाडा प्राधिकरणाने याच 69 लाभार्थी व्यक्तींच्या घरांच्या किमतीमध्ये पाच लाखांची कपात केली आहे आणि मोठा दिलासा दिला आहे. 

Mhada Flats Mumbai

कोकण मंडळाच्या माध्यमातून जे व्याज आकारले होते ते व्याज कमी करण्यात आले आहे. म्हणजेच एकूण 5,02,421 इतकी व्याजाची रक्कम कमी केली आहे. त्यामुळे आता लाभार्थी व्यक्तींना 59 लाख 74 हजार 800 रुपयांऐवजी जास्तीत जास्त 54 लाख 72 हजार 370 रुपयांमध्ये घर उपलब्ध करून दिले जाईल (ready to move flats in mumbai). परंतु यावेळी 125 विजेत्या व्यक्तींना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यांना घरांची जी काही ठरलेली रक्कम असेल ती रक्कम संपूर्णपणे भरून ताबा घ्यावा लागेल. 

खुशखबर! या लोकांना मिळणार चार बेडरूमची घरे; सिडकोची चार बेडरुमची 525 घरे..पहा कोणाला मिळणार आणि किंमत?

2018 मध्ये कोकण मंडळाच्या माध्यमातून 9,018 घरांची सोडत काढली होती. या सोडती मधील संकेत क्रमांक 276 मध्ये 194 घरांचा मध्यम गटाच्या माध्यमातून समावेश करण्यात आला होता. यामधील एकूण 69 घरे ही 2005 मध्ये झालेल्या लॉटरी प्रक्रियेत ज्यांना घर मिळाले नाही त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. तर अशावेळी 125 घरांची सोडत काढली होती (2bhk Apartments in Mumbai). या माध्यमातून एकूण 194 घरांसाठी महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख 45 हजार 236 रुपये निश्चित केले. दरम्यानच्या कालावधीमध्ये ही घरे परिपूर्ण झाली आहेत. परंतु वाहनताळाचा काही मुद्दा निर्माण होत असल्यामुळे घरांचा ताबा रखडला आहे.

सिडकोच्या घरासाठी अर्ज करत असाल तर आता झाला हा मोठा बदल..सिडकोचे घर पाहिजे? पहा बातमी..!

अशावेळी मंडळाच्या माध्यमातून घरांच्या किमतीमध्ये 16 लाख 29 हजार 564 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे घरांच्या किमती थेट गगनाला पोहोचल्या. एकीकडे मंडळाने हा निर्णय घेतला आणि दुसरीकडे या निर्णयामुळे 125 विजेत्यांना तसेच 69 लाभार्थ्यांना नाराजी निर्माण झाली. त्यांनी म्हाडा प्राधिकरणाकडे जी काही वाढीव किंमत आहे ती कमी करावी अशी मागणी केली. परंतु अशावेळी प्राधिकरणाच्या माध्यमातून नकार दिला तर ते शेवटी आता विजेत्या नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि हे प्रकल्प प्रलंबित केले.

ऑफर.. ऑफर.. स्वस्तात घर घेण्याची मोठी ऑफर; आता ही संधी सोडू नका..पहा फायद्याची बातमी..!

बाळकुम मधील जी घरे आहेत त्यांच्या किमतीचा वाद न्यायालयामध्ये असला तरी घरांची किंमत कमी करण्यासाठी विजेत्या तसेच लाभार्थी नागरिकांचा म्हाडाकडे व गृहनिर्माण विभागाकडे पाठपुरावा सुरूच होता. या पाठपुराव्यामध्ये त्यांना यश आले आणि 69 लाभार्थी व्यक्तींना शेवटी म्हाडाच्या उपाध्यक्षांच्या माध्यमातून म्हणजेच संजीव जयस्वाल यांनी लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आणि पाच लाखांचे व्याज माफ केले, घरांचे दर कमी केले. त्यांच्या या निर्णयामुळे 69 लाभार्थी व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु 125 विजेत्यांचा वाढीव भर आहे तो अजून तसाच आहे.

आता घ्या तुमच्या बजेटमध्ये घर; पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

६९ लाभार्थी कोण-

कोकण मंडळाच्या माध्यमातून 2005 मध्ये एक गृह योजना हाती घेतली. त्याचप्रमाणे 69 लाभार्थ्यांकडून घरांची जे काही किंमत असेल त्या किमतीच्या दहा टक्के रक्कम भरून घेतली. परंतु काही कारणास्तव ही योजना अमलात आणली गेली नाही आणि मंडळाच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तींची 10% रक्कम परत केली नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या जागेवर लाभार्थी व्यक्तींसाठी गृह योजना राबविण्यात येणार होती अशावेळी त्याच जागेवर महामंडळा अंतर्गत एक मोठा असा गृह प्रकल्प हाती घेतला. तसेच गृह प्रकल्पामध्ये या सर्व 69 लाभार्थी व्यक्तींना सामावून घेण्यात आले. यामध्ये गृहप्रकल्प अंतर्गत 125 घरांसाठी 2018 मध्ये सोडत काढली आणि 69 घरे लाभार्थी व्यक्तींसाठी राखीव ठेवली.

६९ विजेत्यांच्या घरांच्या किंमतीत घट का-

विविध कारणास्तव मंडळाच्या माध्यमातून घराच्या किमतीमध्ये वाढ केली. परंतु त्याचवेळी 69 लाभार्थ्यांच्या माध्यमातून मंडळाने 2005 मध्येच काही विशिष्ट रक्कम घेतली होती. ती परत सुद्धा केली नाही. महत्त्वाचा भाग म्हणजे 2005 पासून हे सर्व लाभार्थी घराच्या प्रतीक्षेमध्ये होते. तर त्यांना म्हाडाच्या किंवा इतर कोणत्याही योजनेमध्ये सहभाग सुद्धा घेता येत नव्हता. त्यांच्या ह्या नुकसानेकडे पाहता प्राधिकरणाच्या माध्यमातून लाभार्थी व्यक्तींना दिलासा देण्याकरिता वाढीव किमतीमधील 5,02,421 रुपये व्याजाची रक्कम त्या ठिकाणी कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

Leave a Comment