आता म्हाडालाच लागली मोठी लॉटरी; आता तुम्हाला सुद्धा घर मिळणार?

मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) घ्यायचं असेल तर सामान्यांना म्हाडाचा मोठा आधार मिळतो. म्हाडा परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देत असल्याने सामान्य मुंबईकर लॉटरीची (Mhada Lottery Mumbai) वाट पाहतात. म्हाडाकडून वारंवार घरांची लॉटरी काढली जाते. त्यातून सामान्यांना घरांची लॉटरी लागते. पण आता म्हाडालाच मोठी लॉटरी लागली आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी..

मुंबईत लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाला आता मोठी ‘लॉटरी’ लागली आहे. मागील 6 महिन्यांमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीमधून तब्बल 1 हजार 391 कोटी एवढ्या रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे आता म्हाडाची तिजोरी भरली असून म्हाडाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. म्हाडाला मुंबईतील घरांमूळे (Mumbai Mhada Flats) सर्वाधिक फायदा होत असतो. मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीपूर्वी ऑगस्ट 2023 पर्यंत म्हाडाच्या तिजोरीमध्ये फक्त 150 ते 200 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होता. पण आता त्यामध्ये 1 हजार 391 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

आता लॉटरी शिवाय घ्या म्हाडाचा 2 BHK फ्लॅट; मिळतील भरमसाठ सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

मुंबई मंडळाकडून जुलै 2023 मध्ये गोरेगाव (Goregaon), बोरिवली, विक्रोळी, शीव, कांदिवली आणि अंधेरी जुहू याठिकाणी असलेल्या 4 हजार 82 एवढ्या घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. आणि ही लॉटरी 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आली होती. आता मुंबई मंडळाकडून 173 दुकाने आणि 17 प्लॉटची विक्री करण्यासाठी ई-लिलाव केला जाणार आहे. मुंबईतील दुकानांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मार्च होती. पण आता मुदतवाढ मिळाल्याने 1 एप्रिल पर्यंत या दुकानांसाठी अर्ज करता येणार आहे. मुंबईतील या 173 दुकानांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुकाने आणि प्लॉटच्या विक्रीतून म्हाडाला तब्बल 500 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता ‘म्हाडा’च्या तिजोरीतील खडखडाट संपुष्टात येणार आहे.

आता मुंबईत सरकारी योजनेतून मिळवा प्लॉट; येथे क्लिक करून पहा किंमती आणि लोकेशन..!

पुण्यात फक्त 9 लाखात म्हाडाचे घर (Mhada Flats)

म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4882 घरे उपलब्ध करून देण्यात आली असून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज 10 एप्रिल 2024 पर्यंत करता येणार आहे. या लॉटरीतील अल्प उत्पन्न गटासाठी असलेले दिवे पुरंदर (सर्वे क्र.1712) येथील घरांची 9 लाख 44 हजार 800 रुपये एवढी अंदाजे किंमत असल्याचं सांगण्यात आलं आहे. येथे एकूण 17 घरे उपलब्ध आहेत.

पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

Leave a Comment