स्वस्तात मस्त घरे; मुंबईत म्हाडा काढणार 4 हजार घरांची लॉटरी, अशी मिळेल घराची चावी | Mhada House lottery 2023

Mhada House lottery 2023 : भारताची आर्थिक राजधानी (Financial capital of India) आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात स्वताचे घर असणे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि मुंबई शहरात आपले स्वत:चे घर असावे असं बर्‍याच जणांचे स्वप्न असते. अशा नागरिकांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट अथॉरिटी (MHADA) येत्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची लॉटरी (Mhada House lottery 2023) काढणार आहे. ज्यांना सध्याच्या चालू दरांपेक्षा स्वस्तात मस्त घर विकत घ्यायचे आहे अशा नागरिकांसाठी येत्या महिन्यात म्हाडा मुंबईमध्ये 4 हजारांपेक्षा जास्त घरांची लॉटरी काढणार आहे अशी माहिती जाणकार लोकांनी दिली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार मार्च महिन्यापर्यंत नागरिकांना म्हाडाच्या घराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याकरिता तयारी देखील सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत म्हाडातर्फे (Mumbai Mhada) काढण्यात येणार्‍या 4 हजार घरांपैकी 2 हजार 683 घरे मुंबई मध्ये असलेल्या गोरेगाव टेकडी या भागातील आहे. तसेच मुंबईतील अजून इतर भागासाठी देखील लॉटरी काढली जाणार आहे.

येथे वाचा – अरे वा! म्हाडाची घरं पाहून तुम्ही व्हाल खुश, कमी किंमतीत मिळणार्‍या घरांचा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा..!

गोरेगावात EWS कॅटेगरीतील नागरिकांसाठी म्हाडाचे 2 प्रकल्प झाले तयार

गोरेगावात म्हाडातर्फे बांधण्यात येणार्‍या 7 इमारती 23 मजल्यांच्या असणार आहेत. कमी उत्पन्न असलेल्यांसाठी ही घरे असणार आहेत. याठिकाणी म्हाडाद्वारे 2 प्रकल्प बनवले जात असून भूखंड-अ आणि भूखंड-ब असे हे प्रकल्प आहे. म्हाडाने या घरांच्या किमती अजून पर्यंत जाहीर केल्या नसल्या तरी जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ते 35 लाख यादरम्यान या घरांच्या किमती असणार आहे. अत्यंत कमी उत्पन्न असलेल्यांसाठी 30 लाख तर कमी उत्पन्न असणार्‍यांसाठी 35 लाख अशा या किमती ठरवल्या जाऊ शकता.

म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा? आणि कागदपत्रे
येथे क्लिक करून पहा

लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर पैसे भरून मिळेल घराची चावी

मिळालेल्या माहितीनुसार लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर पैसे भरून घराची चावी मिळणार आहे. पैसे भरून लगेच घराचा ताबा मिळणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

येथे वाचा – खुशखबर! म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी मिळेल लोन, जाणून घ्या कामाची माहिती..!