खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; जाणून घ्या कोठे आणि कधी मिळणार?

Mhada Flats : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची बातमी जेव्हाजेव्हा समोर येते तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकजण आर्थिक जुळवाजुळव सुरु करतात. कारण म्हाडाची घरे (Mhada Flats) परवडणाऱ्या दरात मिळत असतात. जर तुम्हाला देखील म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. आता म्हाडाचा अजून एक प्रकल्प (Mhada Project) तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावणार आहे. 

आपलं स्वत:चं घर असावं असं स्वप्न अनेकजण पाहतात. त्यासाठी कठोर मेहनत घेतली जाते. पण घरांच्या किंमती जास्त असल्याने घराचे स्वप्न पूर्ण होत नाही, म्हणून जास्तीत जास्त लोक म्हाडा घरांच्या लॉटरीची (Mhada lottery 2023) प्रतीक्षा करत असतात. दरम्यान आता म्हाडाच्या एका प्रकल्पामूळे सामान्य व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता येत्या काळात म्हाडाच्या या प्रकल्पाचा फायदा अनेकांना होताना दिसणार आहे.

आता पुण्यात याठिकाणी मिळतायेत सर्वात स्वस्त घरे; येथे क्लिक करून पहा कुठे मिळेल स्वस्त घर..

आता येत्या काळामध्ये याच म्हाडाकडून नेमकी कुठं सोडत निघते आणि यात कोणत्या भाग्यवंतांचं नशीब फळफळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यातील शहरी भागांमध्ये म्हाडाच्या अनेक प्रकल्पांनी बर्‍याच जणांच्या स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये म्हाडाचा तब्बल 4500 घरांचा प्रकल्प (Mhada Housing) उभा राहणार असून त्याकरिता मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती अतुल सावे यांच्याकडून देण्यात आली आहे. 

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ऑरिक सिटी याठिकाणी म्हाडाचा अल्प तसेच मध्यम उत्पन्न गटाकरिता हा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि नागरिकांसाठी जवळपास 4500 घरं बांधण्याचा मानस ठेवला आहे. म्हाडाच्या या प्रकल्पात पाणी, वीज, रस्ते तसेच ड्रेनेज अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा तयार असल्याने कामगार वसाहतीकरिता हा प्रकल्प म्हाडाला फायद्याचा ठरेल असं सांगण्यात येत आहे. 

संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

दरम्यानच्या काळात, प्रस्तावित असलेल्या जागेच्या दरासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावर मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबतच्या बैठकीनंतर सदर प्रकल्पाचा प्रस्ताव मार्गी लावण्यात येणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

कसा पुढे जाणार हा प्रकल्प? (Mhada Housing Project)

ऑरिक सिटीमध्ये नागरी वसाहतींकरिता विकसित जमीन असल्याने म्हाडा संबंधित 7.50 हेक्टर एवढी जमीन विकत घेणार अशी माहिती आहे. आणि नंतर अल्प आणि मध्यम उत्पन्न गटामधील कामगारांसाठी याठिकाणी एक Smart City उभारली जाईल. या धर्तीवर म्हाडाच्या माध्यमातून शासनाशी पत्रव्यवहार देखील झाल्याची माहिती सुद्धा सोशल मीडियावर मिळाली आहे. 

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment