खुशखबर! म्हाडाची घरे झाली स्वस्त; आता या किंमतीत मिळणार म्हाडाचे घर, पहा बातमी..!

Mhada Flats Mumbai : मुंबईत घर घ्यायचं म्हटलं की भरमसाठ पैसा पाहिजे, हे अगदी खरं आहे. पण आता कमी पैशात सुद्धा मुंबईत हक्काचे घर (2 BHK Flats Mumbai) घेता येते, तेही चांगल्या सोयीसुविधा असलेल्या लोकेशनवर. हे सर्व म्हाडामूळे शक्य झाले आहे. मुंबईत सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा वारंवार घरांची लॉटरी (Mhada Lottery Mumbai) घेऊन येते. ज्यामुळे सामान्यांना परवडणाऱ्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची संधी मिळते. अलीकडेच म्हाडाच्या घरांच्या किंमती संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहे. या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार? याची माहिती पाहूया..

येथील घरांच्या किंमती झाल्या कमी

म्हाडाची घरे खासगी विकासकांपेक्षा कमी किमतीत मिळत असल्याने अलीकडे जास्तीत जास्त लोक म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना दिसून येतात. त्यात आता ठाण्यातील बाळकुम येथील म्हाडाच्या घरांच्या किंमतीत तब्बल 5 लाख 41 हजार 284 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही घरे स्वस्त झाली आहे (Mhada Flats Thane).

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

आता या किमतीत मिळणार घर

म्हाडा कोकण मंडळाच्या 2018 मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील बाळकुम येथील संकेत क्र.276 मधील घरांच्या योजनेमधील 68 एवढ्या लाभार्थ्यांना अखेर म्हाडाकडून दिलासा मिळाला आहे. बाळकुम येथील मध्यम गटामधील घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहे. याआधी या घरांची किंमत 59 लाख 74 हजार 800 एवढी होती. आता या निर्णयानंतर बाळकुममधील घरांसाठी या लाभार्थ्यांना 54 लाख 33 हजार 516 रुपये द्यावे लागणार आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

घरांच्या किमतीत असा झाला चढ-उतार

मंडळाकडून बाळकुममधील या घरांची विक्री किंमत 43 लाख 45 हजार 236 रुपये अशी निश्चित करण्यात आली होती. पण मंडळाने 2022 मध्ये या घरांच्या किमतीत तब्बल 16 लाखांची वाढ केली. त्यानंतर या घरांची किंमत 59 लाख 74 हजार 800 रुपये अशी झाली. त्यामुळे विजेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. गेल्या आठवड्यातील बैठकीत म्हाडाने अखेर प्रस्ताव मंजूर केला आणि 68 विजेत्यांना दिलासा दिला आहे. पण याच योजनेमधील इतर 125 विजेत्यांच्या घरांच्या किंमती कमी करण्याच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.

काय सांगता! मुंबईत म्हाडाचे गाळे खरेदीसाठी मोठी झुंबड; किंमत फक्त एवढी, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment