खुशखबर! उद्यापासून म्हाडाच्या 5 हजार 309 घरांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, आता मिळेल स्वस्त घर..!

MHADA Houses Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रामधील 5309 घरांच्या  सोडतीसाठीची जाहिरात शुक्रवारी म्हणजेच उद्या प्रसिद्ध होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच दिवसापासून ऑनलाइन अर्जविक्री-स्वीकृतीला देखील सुरुवात होणार आहे. ही सोडत नोव्हेंबर महिन्यात काढली जाण्याची शक्यता आहे.

कोकण मंडळाकडून (Mhada Konkan Lottery) या वर्षी मे महिन्यात 4 हजार 654 एवढ्या घरांसाठी सोडत काढली होती. पण या सोडतीमधील बरीच घरे विकली गेली नव्हती. तसेच प्रथम प्राधान्य आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेमधील (Mhada Housing Scheme) घरांना खूप कमी प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या सोडतीमध्ये शिल्लक घरे तसेच म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या घरांसाठी सोडत काढण्याचा महत्वाचा निर्णय कोकण मंडळाकडून घेण्यात आला आहे.

खुशखबर! सरकारची नवीन योजना सुरू; आता या लोकांना मिळणार घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

ही सोडत जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात काढली जाणार होती. पण काही कारणांमुळे ही सोडत लांबणीवर टाकण्यात आली. पण आता ही सोडत काढली जाणार आहे.  कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 5309 एवढ्या घरांसाठी नोव्हेंबर महिन्यात सोडत काढली जाणार आहे, आणि या घरांसाठी उद्या (15 सप्टेंबर रोजी) जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

आता मोठी संधी! स्वस्तात घ्या म्हाडाचे घर; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

यासाठी उद्या पासूनच अर्जविक्री-स्वीकृतीला सुरूवात होणार आहे. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प आणि मध्यम तसेच उच्च अशा चारही उत्पन्न गटांमधील घरांचा समावेश आहे. आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण (Mhada Housing) आणि पंतप्रधान आवास योजना अशा योजनेमधील ही घरे आहेत.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Leave a Comment