सामान्यांना समृद्धीलगत नवनगरात म्हाडाची घरे मिळणार? समृद्धीलगत म्हाडाचे घर पाहिजे का? पहा बातमी..!

Mhada Flats : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) म्हाडाकडून 1 हजार कोटी रुपये एवढे कर्ज देण्यात आले होते. हे कर्ज थकीत असल्यामुळे या मोबदल्यात आता म्हाडाला (Mhada) समृद्धीलगत असलेल्या ‘एमएसआरडीसी’च्या नवनगर प्रकल्पामध्ये जमिनी द्याव्या, असा प्रस्ताव म्हाडाकडून एमएसआरडीसीला पाठविण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर 8 तासांमध्ये पार करता यावे म्हणून ‘एमएसआरडीसी’कडून 701 किलो मीटर लांबी असलेल्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर म्हाडाला 701 किलो मीटर दरम्यान जमिनी मिळाल्यास पुढील काळात समृद्धीलगत असलेल्या नवनगरात म्हाडाची घरे (Mhada Flats) बांधण्यात येतील आणि ही घरे लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध होतील.

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा, येथे क्लिक करून पहा बातमी..

मुंबई- नागपूर अंतर कमी वेळेत पूर्ण करता यावे यासाठी समृद्धी महामार्गाचे बांधकाम केले जात असून या प्रकल्पासाठी तब्बल 54 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असून एमएसआरडीसीने (MSRDC) हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडून कर्ज म्हणून घेतला होता. त्यात म्हाडाकडून समृद्धीसाठी 1 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा 600 किलो मीटरचा टप्पा लोकांच्या सेवेमध्ये सुरू झाला असून पुढील काळात लवकरच पूर्ण समृद्धी महामार्ग वाहतूक सेवेसाठी सुरू होणार आहे. हे कर्ज एमएसआरडीसीकडून वसूल करून घेण्यासाठी म्हाडाने नेहमीच पाठपुरावा सुरू केला आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

दरम्यान, समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी घेतलेल्या कर्जाचे रूपांतर समभागामध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे म्हाडाला (Mhada) समभागामधून लाभांश घेण्याचा पर्याय मिळाला आहे. पण या लाभांशाऐवजी समृद्धीलगत असलेल्या नवनगरांमध्ये घरांची निर्मिती करण्यासाठी जमिनी मिळाव्या, अशी मागणी म्हाडाकडून करण्यात आली आहे. म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या संदर्भातला प्रस्ताव 1 नोव्हेंबरला एमएसआरडीसीला पाठविण्यात आला आहे.

एमएसआरडीसीकडून समृद्धीलगत वेगवेगळ्या ठिकाणी नवनगरे (New Township) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उभारण्यात येणार्‍या नवनगरांमध्ये घरांची निर्मिती करण्यासाठी म्हाडाला कर्जाच्या मोबदल्यात जमीन उपलब्ध करून द्यावी, असा म्हाडाचा प्रस्ताव असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. सध्याच्या काळात म्हाडाकडे घरे बांधण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत एमएसआरडीसीकडून जागा मिळाली तर यावर मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गालगत घरे (Mhada Flats) उपलब्ध होतील..

आता स्वप्नातलं घर शक्य; या बँकेतून स्वस्तात होम लोन घेऊन करा घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा बँकांची यादी..!

म्हाडाचे नियोजन काय? (Mhada Flats)

म्हाडाकडून कोकण, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या मंडळाच्या अधिकार्‍यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहे. आपापल्या जिल्ह्यामध्ये समृद्धीलगतच्या नवनगरामधील जागेचा शोध घेऊन त्याची पाहणी करण्यात यावी आणि ती जागा गृहनिर्मिती करण्यासाठी व्यवहार्य ठरेल का याची पडताळणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. नवनगरांमध्ये जागा मिळाल्यास त्याठिकाणी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांकरिता घरे बांधण्याचे म्हाडाचे नियोजन असल्याची माहिती आहे.

येथे वाचा – याठिकाणी प्लॉट, घर आणि फ्लॅट खरेदी करा; भविष्यात दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता..!

Leave a Comment