आनंदाची बातमी! आता म्हाडा’ला या जिल्ह्यांमध्ये घरे बांधणे होणार सोपे, पहा कोणत्या जिल्ह्यात उपलब्ध होणार स्वस्त घरे?

Mhada News: महाराष्ट्र गृहनिर्माण तसेच क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा व सिडको. या दोन विशेष गृहनिर्माण प्राधिकरणाच्या अंतर्गत नागरिकांना अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये मुंबई, पुणे तसेच राज्यभरातील इतर मोठमोठ्या शहरांमध्ये घर उपलब्ध करून दिली जात आहेत. प्रत्येक नागरिकाचे हेच स्वप्न असते की, आपले स्वतःचे हक्काचे घर असावे.

अशावेळी पुणे तसेच मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये घर असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. परंतु सध्याची परिस्थिती बघितली तर घरांच्या व प्लॉटच्या किमती या कित्येक पटीने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर खरेदी करणे किंवा घराची बांधणी करणे सध्या परवडत नाही (Mhada lottery). परंतु म्हाडा तसेच सिडकोच्या माध्यमातून अशा गरजू नागरिकांना घरांच्या बाबतीत चांगलाच दिलासा मिळत आहे. अशा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच माडाच्या माध्यमातून आता एक महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आले आहे. चला तर याविषयी जाणून घेऊया..

अरे व्वा! नवी मुंबईत मिळवा फक्त 12 लाखात घर; एवढीच घरे विक्रीस उपलब्ध; अर्ज प्रक्रिया सुरू; वाचा सविस्तर;

पुणे तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये म्हाडाला घरांची उभारणी करण्यासाठी मिळणार तब्बल 70 हेक्टर जमीन;

म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांना अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी. तसेच अशा शासकीय जमिनी विकसित करून देण्यासाठी. सदनिकांचे जे काही उद्दिष्ट आहे त्याची पूर्तता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे (Mhada housing). यामधीलच एक महत्त्वाचा भाग म्हणून म्हाडाच्या पुणे विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तब्बल 70 हेक्टर शासकीय जमीन निवासी बांधकाम करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती मिळाली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून या जमिनीच्या हस्तांतरण करून घेण्याची प्रक्रिया ताबडतोबपणे सुरू करावी. अशा सूचना राज्याचे गृहमंत्री अतुल सावे यांनी केली आहेत.

मंगळवारी पुणे दौऱ्यावर सावे असताना त्यावेळी त्यांनी म्हाडाच्या कार्यालयामध्ये असलेल्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत एक विशेष बैठक घेतली आणि पुणे विभागाचा या ठिकाणी संपूर्ण आढावा घेण्यात आला (mhada housing latest news today). तसेच यामध्ये नागरी जमीन व अधिनियमाच्या माध्यमातून पुणे विभागामध्ये प्रशासनाच्या ताब्यामध्ये जितक्या जमिनी आहेत त्या सर्व जमिनी निवासी विकासनासाठी म्हाडा विभागाला हस्तांतरित करण्यात यावे असा प्रस्ताव पुणे महामंडळाच्या माध्यमातून प्रधान सचिवांकडे पाठवला.

खुशखबर! आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर; पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..

या अंतर्गत जे कोणी गरजू नागरिक असतील त्यांना अगदी परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माण योजना राबवली जात असून, समाजामधील अल्प, अत्यल्प तसेच मध्यम उत्पन्न गटामधील नागरिकांकरिता या घरांची उपलब्धता करून दिली जाईल (ready to move flats). याप्रमाणे जमीन सार्वजनिक प्रयोजनार्थ आरक्षित नसल्याची सुद्धा खात्री या ठिकाणी करून घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेमध्ये ज्या काही विविध गायरान जमिनी किंवा इतर शासकीय ताबा असलेल्या जमिनी उपलब्ध आहेत याची खात्री करावी.

सर्व जमिनीच्या नोंदी तसेच संबंधित जमिनीवरील जो काही महसूल विभाग तसेच प्रलंबित खटले इत्यादी विषयी माहिती संदर्भामध्ये तांत्रिक समितीच्या माध्यमातून मान्यता घेऊन या सर्व जमिनी म्हाडाच्या विभागाला विकसन हेतू उपलब्ध करून देण्या साठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबतच याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

अशावेळी या सर्व जमिनी म्हाडाला ला हस्तांतरित केलं तर ताबडतोब विविध अटी आणि शर्ती यांचे पालन करून तीन वर्षाच्या आत या जमिनीवर गृहप्रकल्प उभा करण्याची योजना म्हाडाणे आखली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा या संदर्भ बद्दल पत्र व्यवहार करावा लागेल. अशा सूचना देखील गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केल्या आहेत.

इतकेच नव्हे तर सर्वसमावेशक योजनेच्या माध्यमातून घराची जास्तीत जास्त संख्या कशा प्रकारे वाढवता येईल यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या सोबतच महानगरपालिका तसेच विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी विकासाच्या माध्यमातून याविषयी विविध प्रकारच्या माहिती घेण्याच्या महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी अतुल सावे यांनी केल्या आहेत.

Leave a Comment