म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? पहा कामाची माहिती..!

Mhada Housing Scheme : प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे हेच स्वप्न असते की, आपले स्वतःचे हक्काचे घर असावे. अलीकडे शहरांमधील वाढत चाललेल्या घरांच्या किमतीकडे बघता नागरिक घर खरेदी करण्याचा विचार करत नाहीत. परंतु म्हाडामुळे अलीकडे कित्येक नागरिकांचे स्वप्न साकार झाले आहे. अगदी तुमच्या बजेटमध्ये म्हाडा तुम्हाला घर उपलब्ध करून देतो. एका व्यक्तीने तर म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर मिळवण्यासाठी स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या नावाने एकूण 83 अर्ज सादर केले होते आणि तेही उच्च उत्पन्न गटासाठी (1 bhk Flat in Mumbai). ही प्रक्रिया केल्यामुळे त्यांना तब्बल 62 लाख 25 हजार रुपयांची अनामत रक्कम बारावी लागली होती. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की म्हाडाच्या घरांचे किती महत्व आहे.

तर मित्रांनो म्हाडाचे घर (Mhada Flat) मिळवायचे असेल तर काय करायचे? त्यासाठी किती रुपये लागतील? गृह कर्ज कुठून प्राप्त करायचे? घर जिंकण्याची शक्यता आहे लॉटरीमध्ये किती आहे? तुम्ही जी काही भरलेली अनामत रक्कम तुम्हाला परत मिळेल का? म्हाडा ने बांधलेल्या बांधकामाचा दर्जा कसा असेल? असे विविध प्रश्न तुमच्या मनात आले असतीलच (2 bhk Flat in Mumbai). तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या एका लेखामध्ये पाहणार आहोत.

येथे वाचा – आता करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज; मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

म्हाडा अंतर्गत असणारे विविध लॉटरी प्रकार (MHADA Housing Scheme)

म्हाडाची लॉटरी प्रक्रिया ही म्हाडाच्या विविध मंडळांमध्ये म्हणजेच विविध शहरांमध्ये राबवली जाते. त्यामध्ये कोकण मंडळ, मुंबई मंडळ, पुणे मंडळ, औरंगाबाद मंडळ, नाशिक मंडळ, नागपूर मंडळ, सोबतच अमरावती मंडळ या म्हाडाच्या विविध मंडळांमध्ये लॉटरी जाहीर केली जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही वरील कोणत्याही शहरांमध्ये घर मिळवण्यासाठी अर्ज सादर करू शकता.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्रता काय असेल?

• म्हाडाच्या लॉटरी साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छिणार असतील त्यांचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे.

• अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी.

• मासिक उत्पन्न 25 ते 50 हजार असल्यास ही अर्ज करणारी व्यक्ती कमी उत्पन्न गटात अर्ज सादर करू शकते.

• ज्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 75 हजार पेक्षाही अधिक आहे ती व्यक्ती उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज सादर करू शकते.

येथे वाचा – खुशखबर! आता येथे कमी पैशात घेता येणार हक्काचे घर; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी असणार घरांची लॉटरी?

अनामत रक्कम आपल्याला परत मिळते का? (2 bhk Flat in Mumbai)

विविध उत्पन्न गटाप्रमाणे वेगवेगळी ठेव रक्कम त्या ठिकाणी आपल्याला भरावी लागते. उदाहरणार्थ अल्प उत्पन्न गटासाठी अर्जाची जी काही ठेव रक्कम असेल ती दहा हजार रुपये आहे आणि यामध्ये तुम्हाला पाचशे रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल (3 bhk Flat in Mumbai). लॉटरीमध्ये नंबर नाही लागला तर दहा हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्सफर होते. परंतु पाचशे रुपयांची प्रक्रिया शुल्क तुम्हाला परत दिली जात नाही.

आवश्यक कागदपत्रे;

म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेसाठी अर्ज करत असताना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करावी लागते. त्यामधील मुख्य कागदपत्रे म्हणजे, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल नंबर, डोम सील, ई-मेल आयडी आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

येथे वाचा – घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा; भविष्यात मिळू शकतो दुप्पट पैसा, येथे क्लिक करून वाचा बातमी..

म्हाडामध्ये घर लागण्याची शक्यता नक्की किती असते?

लेखाच्या सुरुवातीला तुम्हाला एक उदाहरण दिले होते, त्यामध्ये एका व्यक्तीने घर मिळवण्यासाठी तब्बल 83 अर्ज सादर केले होते. यावरून तुम्हाला नक्कीच कल्पना आली असेल की म्हाडाची लॉटरी जिंकणे ही गोष्ट नशिबाचीच आहे. कारण लोक कित्येक वर्षांपासून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करत आहेत. कित्येक जण कुटुंबीयांच्या नावाने सुद्धा अर्ज भरत आहेत. परंतु अद्याप लॉटरी लागली नाही. यामध्ये अशी सुद्धा उदाहरणे आहेत ज्यांनी पहिल्यांदा अर्ज केला आणि त्यांना घर लागले. मित्रांनो ज्या व्यक्तीने एकूण 83 अर्ज सादर केले होते त्या व्यक्तीला नशीबाने पतंग नगर घाटकोपर परिसरामध्ये एक घर लागले.

लॉटरी लागावी यासाठी कोणती विशेष प्रक्रिया असते का?

अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची लॉटरी लागेल की नाही हे सांगणे अगदी कठीण आहे. परंतु थोडा अभ्यास करून आपण विचार केला तर नक्कीच स्पर्धा आपण कमी करू शकतो. विविध उत्पन्न गटांसाठी म्हाडा ने विविध घरे उपलब्ध करून दिले आहेत. सोबतच काही विशिष्ट गटांसाठी म्हाडा आरक्षित घरे देत आहे. जसे की गिरणी कामगारांसाठी सोबतच पत्रकारांसाठी इत्यादी तुम्ही विशिष्ट अशा गटांशी संबंधित असला तर नक्कीच तुम्ही त्यांच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकता आणि लॉटरी लागण्याचे चान्सेस वाढवू शकता.

लॉटरी लागल्यानंतर काय प्रोसेस असेल? ready to move flats in mumbai

ज्यावेळी म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुमचे नाव येते तेव्हा आठवड्याच्या आत जी काही महत्वाची कागदपत्रे असतील ती घेऊन कार्यालयात जावे आणि घराची जी काही किंमत असेल त्या किमतीच्या दहा टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला संबंधित कार्यालयाच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र सोबतच आवश्यक कागदपत्रे ही थेट बँकेमध्ये जमा करावे आणि गृह कर्ज मिळवावे.

येथे वाचा – संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

लॉटरी लागल्यानंतर लगेच आपल्याला घर मिळते का?

तुम्ही कोणत्या योजनेच्या माध्यमातून अर्ज केला आहे? सोबतच सध्याच्या प्रकल्पाची परिस्थिती काय आहे? या सर्व गोष्टींवर ही प्रोसेस अवलंबून असते. लॉटरी लागूनही अनेक प्रकल्पांचे काम सुरूच असते. काही प्रकल्प पूर्णपणे तयार झालेले असतात. त्यामुळे घराचा ताबा आपल्याला लगेच मिळणार आहे की नाही? पूर्णपणे तुमच्या लॉटरीमध्ये लागलेल्या घराच्या प्रकल्पावर अवलंबून असते.

म्हाडाच्या घरांच्या बांधकामाचा दर्जा कसा असतो?

ही एक प्रशासनाने राबवलेली योजना असल्यामुळे सर्व घरांचा दर्जा हा एकदम उत्कृष्ट असतो. परंतु अनेक प्रकल्प खाजगी बांधकाम व्यवसायिकांनी सुद्धा बांधलेले असतात (Flat in Mumbai). त्यामुळे तुम्ही साईटला भेट देऊन खात्री करून घ्यावी. अंडर कन्स्ट्रक्शन साइटवर सुद्धा जाऊन माहिती मिळवावी आणि याचा पूर्णपणे अधिकार सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे.

Leave a Comment