Mhada konkan Lottery 2023 : स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी खुशखबर आली आहे. कारण म्हाडा कोंकण मंडळातर्फे ठाणे जिल्हा, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याठिकाणच्या ज्या वेगवेगळ्या गृहनिर्माण योजना (Housing Schemes) आहे त्या योजनेअंतर्गत स्वस्तात घरे मिळवण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता स्वस्त घरांसाठी अनेकांना अर्ज करता येणार आहे. अगोदर म्हाडाच्या कोंकण मंडळातील 4640 घरांसाठी आणि 14 भूखंडांच्या विक्रीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल होती. पण आता ही तारीख वाढवून 19 एप्रिल ही तारीख ठेवण्यात आलेली आहे. अशी माहिती स्वतः म्हाडा कोंकण मंडळाच्या (Mhada konkan Lottery) मुख्य अधिकार्यांनी दिली आहे. आणि अनामत रक्कम RTGS/ NEFT एनइएफटीच्या माध्यमातून दि.21 एप्रिल रोजी रात्री 11.59 भरता येईल..
Housing Schemes
जास्तीत जास्त अर्जदारांनी अर्ज करावे यासाठी IHLMS 2.0 या संगणकीय प्रणालीतील अर्ज प्रक्रिया अधिक अनुकूल करण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. यात नवीन बदल करण्यात आल्याने पीएम आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) अर्ज करत असताना आता पीएमएवाय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहिलेलं नाही. सदरील प्रमाणपत्र हे सदनिकेचा ताबा मिळवण्यापूर्वी घेणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम आवास योजनेअंतर्गत विक्रीसाठी 948 सदनिका तयार आहे.
स्वस्त घरासाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा
मिळालेल्या माहितीनुसार सदर सोडतमध्ये अर्जदाराचे उत्पन्न दाखवण्यासाठी आयकर परतावा प्रमाणपत्र (Income Tax Return certificate) प्रणालीत अपलोड करणे गरजचे आहे. सदर प्रमाणपत्र हे अपलोड केल्यानंतर प्रणाली Optical Character Recognition करून पोचपावतीचा क्रमांक, एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या सर्व गोष्टी तपासत असते. जर का अर्जदारांनी चुकीचे आयकर परतावा प्रमाणपत्र अपलोड केले तर अर्जदाराचे उत्पन्न निश्चितीस अडचणी निर्माण होत होत्या. पण आता सध्या अर्जदार व्यक्तीने आयकर परतावा प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलोड केल्यानंतर अर्जदाराचे एकूण उत्पन्न, मूल्यांकन वर्ष व नाव या विषयीची सर्व माहिती एका चौकटीमध्ये म्हणजेच पॉप अप मध्ये दर्शविली जाणार आहे.
ही माहिती अचूक असल्यास अर्जदार व्यक्तीकडून चेक बॉक्समध्ये याची संमती घेतली जाईल. पण सदर माहिती प्रणालीत अपलोड केलेल्या आयकर परतावा प्रमाणपत्रातील माहितीशी जुळाली नाही तर आता अर्जदार व्यक्तीला सदर माहितीमध्ये दुरुस्ती/बदल करण्याची देखील सुविधा आता प्रणालीत दिली गेली आहे. आणि आता सदर चेक बॉक्स जर तपासला नाही तर अर्जदार व्यक्तीला अर्ज भरणा करण्याची पुढील प्रक्रिया करता येणार नाही हे लक्षात ठेवा..
स्वस्त घरासाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा
म्हाडाकडून ही ऑनलाईन संगणकीय सोडत दि.10 मे, 2023 रोजी सकाळी 10 वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह याठिकाणी काढली जाणार आहे. आतपर्यंत 22,380 अर्जदार लोकांनी सोडतीकरिता अर्ज केले आहे. आणि यातील 12360 अर्जदारांनी अर्जासोबत अनामत रक्कम सुद्धा भरलेली आहे. आणि सोडतीमधील पात्र असलेल्या अर्जांची अंतिम यादी 04 मे, 2023 रोजी संध्याकाळी 6 च्या दरम्यान म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर प्रसिद्ध होणार आहे. आणि दिनांक 10 मे, 2023 या रोजी सकाळी 10 च्या दरम्यान पात्र असलेल्या अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे. तसेच अर्जदारांना सोडतीचा निकाल आपल्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून, ई-मेल द्वारे सोबतच ऍपवर देखील प्राप्त होणार आहे.
घरांसाठी अर्ज भरत असताना अर्जदार लोकांना आलेल्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी अर्जदार 022- 69468100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात.