बातमी घर योजनेची; म्हाडाच्या घर लॉटरीची प्रतीक्षा संपली, पहा आज जाहीर झालेली जाहिरात..!

Mhada konkan lottery 2023 : म्हाडा घरांच्या लॉटरीसाठी प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळातील (Mhada konkan lottery 2023) 4 हजार 752 घरांची सोडत प्रक्रिया या चालू आठवड्यात सुरू होणार आहे. म्हाडा कोकण मंडळातील तयार असलेल्या घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. यात कोकण मंडळातील ठाणे, पालघर, वसई, कल्याण, विरार, सिंधुदुर्ग या ठिकाणचा समावेश आहे. येत्या 8 तारखेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

MHADA Housing Scheme

महत्वाची माहिती अशी की लॉटरीत सहभाग घेण्यासाठी 12 एप्रिल या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि 4 हजार 752 घरांची लॉटरी दि.10 मे यादिवशी काढली जाणार अशी माहिती म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारुती मोरे यांनी दिली आहे. आता मुंबई स्वत:चे घर असावे असं स्वप्न पाहणाऱ्यांची प्रतीक्षा अजून वाढली आहे. कोकण मंडळाने लॉटरी काढण्याच्या प्रक्रियेत मुंबई मंडळाला मागे पाडले आहेत.

येथे वाचा – नवीन घर बांधायचं आहे का? येथे पहा कुठे मिळतंय सर्वात स्वस्त होम लोन..!

मुंबईमध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी (Mumbai Mhada Lottery) 4 वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. मुंबई मंडळाकडून 4 हजार घरे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त 2 हजार 683 घरे गोरेगावात आहेत. यंदापासून म्हाडाद्वारे लॉटरी प्रक्रिया 100% ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्जदार देत असलेले सर्व कागदपत्रे फक्त ऑनलाइन तपासले जाणार आहेत. अर्जदारांना या महिन्यापासून म्हाडाच्या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी करून लॉटरीत सहभाग घेता येणार आहे.

येथे वाचा – अरे वा! म्हाडाची घरं पाहून तुम्ही व्हाल खुश, कमी किंमतीत मिळणार्‍या घरांचा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा..!

ही 7 कागदपत्रे तयार ठेवावी लागणार (Mhada Lottery 2023)

सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत लॉटरीत सहभाग घेण्यासाठी अर्ज भरणार्‍या व्यक्तीला 21 कागदपत्रे सादर करावी लागत होती. आता लॉटरीच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल करून म्हाडाने आवश्यक कागदपत्रांची संख्या फक्त 7 ठेवली आहे. लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी आता अर्ज करणार्‍या व्यक्तीला ही 7 कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. ही कागदपत्रे पुढीलप्रमाणे (1) आधार कार्ड, (2) पॅन कार्ड, (3) अधिवास प्रमाणपत्र, (4) उत्पन्नाचा दाखला, (5) प्रतिज्ञापत्र, (6) जातीचे प्रमाणपत्र, (7) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या वर्गाचे प्रमाणपत्र… इत्यादी कागदपत्रे आवश्यक करण्यात आलेली आहे.

वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लीक करा