खुशखबर! म्हाडाकडून घरांसाठी पुन्हा लॉटरी; आता स्वस्तात उपलब्ध होणार एवढी घरे, पहा बातमी..!

Mhada Konkan Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4000 घरांच्या लॉटरीनंतर आता म्हाडाच्या कोकण मंडळाद्वारे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुमारे 4500 घरांची लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाचे (Mhada) उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या मुंबई मंडळाच्या लॉटरी (Mumbai Mhada Lottery) दरम्यान केली. आता ही घरे ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये असणार आहे. 

गिरणी कामगारांना बीडीडी चाळीमध्ये घर मिळावे यासाठी काम सुरू असल्याचं देखील जयस्वाल यांनी सांगितले. लॉटरीत मिळालेल्या घराचे पैसे दोन टप्प्यामध्ये भरता येणार आहे. प्रथम 25 टक्के रक्कम आणि नंतर 75 टक्के रक्कम भरता येणार आहे. विजेते ठरलेल्यांना 6 महिन्यामध्ये घराचा ताबा मिळेल.

म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाद्वारे मुंबईमधील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून बोरीवली, अंधेरी, घाटकोपर, जुहू, गोरेगाव, कांदिवली, विक्रोळी, सायन, पवई आणि ताडदेव याठिकाणी उभारण्यात आलेल्या 4082 घरांच्या विक्रीसाठी प्राप्त 1 लाख 20 हजार 244 पात्र असलेल्या अर्जांची संगणकीय सोडत सोमवारी नरिमन पॉइंट येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काढण्यात आली.

Leave a Comment