MHADA Lottery 2023 : नवी मुंबई व राजधानी मुंबई वगळता महाराष्ट्र राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच पुणे महामंडळ सोबतच कोकण, औरंगाबाद, नाशिक, नागपूर गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरच मोठी भेट मिळेल. म्हाडाकडे (MHADA House Lottery) या विभागाअंतर्गत लवकरच जवळपास एक लाख घरांची उपलब्धता होणार आहे. खाजगी विकासकांकडून ही सर्व घरे विकसित केली आहेत. MHADA Lottery 2023
सर्वसामान्य नागरिकांना मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 2013 मध्येच ही योजना सुरू केली होती. दरम्यानच 2018 मध्ये या योजनेत बदल करण्यात आले होते. आता नवीन बदलानुसार सर्व गृहनिर्माण योजनेचा अंतर्भाव 2023 च्या योजनेनुसार केला जाईल…
MHADA House Lottery
या योजनेच्या माध्यमातून आता चार हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षाही अधिक भूखंडावर गृहनिर्माण विकासकामांना अल्प उत्पन्न गटातील सर्व नागरिकांसाठी यासोबतच आर्थिक दृष्ट्या दुबळ असलेल्या नागरिकांसाठी 20 टक्क्यांनी घर बांधणीचा नियम निर्गमित करण्यात आला आहे. विकासकांनी तयार केलेली ही सर्व घरे म्हाडाकडे सोपवली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून सोडत प्रक्रियेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना ही घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. या सर्व घराच्या निर्मितीसाठी जो काही खर्च असतो तो म्हाडाच्या माध्यमातून उचलला जातो.
येथे वाचा – खुशखबर! म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी मिळेल लोन, जाणून घ्या कामाची माहिती..!
शासनाच्या योजनेबाबत विशेष गोष्ट सांगायची झाली तर या योजनेचा लाभ अनेक विकासकांनी अधिकचे चटई क्षेत्रफळ घेतले असून माडाला 20 टक्के घरे सुपूर्द केलेली नाहीत. वास्तविकपणे पाहता 2018 मध्ये शासनाने या योजनेत सुधारणा केली होती. त्याचवेळी म्हाडाला घर सुपूर्द केल्याशिवाय संबंधित महानगरपालिका असतील त्यांनी निवास योग्य प्रमाणपत्र अजिबात विकासकांना देऊ नये असे सांगितले होते.
असे असूनही महानगरपालिकांनी या योजनेमधील सर्व तरतुदीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आणि 20% घरे ही माडाला वर्ग झाली आहेत का नाही याची तपासणी न करता संबंधित विकासक असतील त्यांना निवास योग्य प्रमाणपत्र देऊन टाकण्यात आले होते. निश्चितच या योजनेचा गैरवापर विकासाच्या माध्यमातून झालेला आहे. दरम्यानच आता ही बाब नाशिक गृहनिर्माण महामंडळ यांच्या लक्षात आलेली असून या गोष्टीकडे खोल लक्ष देत नासिक गृहनिर्माण महामंडळाकडे विकासकांच्या माध्यमातून जवळपास 15000 घरे वर्ग केले जातील.
नासिक गृहनिर्माण महामंडळाला ही बाब लक्षात आलेली आहे. हे पाहता या सोबतच पुढील प्राप्त होणारी घरे महाडाच्या महामंडळाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी याबाबतची पुढील माहिती डिटेल्स मध्ये मागवलेली आहे. म्हणजेच आता नाशिक गृहनिर्माण महामंडळाकडे जशी घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच घरे औरंगाबाद कोकण पुणे नागपूर या गृहनिर्माण महामंडळाकडे उपलब्ध होतील. अशी चिन्ह दिसत आहेत.
म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा? आणि कागदपत्रे
येथे क्लिक करून पहा
मीडियाच्या रिपोर्टनुसार म्हाडाकडे आता विकासाच्या माध्यमातून तब्बल एक लाखांच्या आसपास घरे उपलब्ध होतील. ह्या उपलब्ध होणाऱ्या घरांमध्ये नाशिक जिल्ह्यातील 15000 घरांचा समावेश देखील असणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून लवकरच या विभागांमध्ये एक लाख घरांची सोडत प्रक्रिया उपलब्ध होईल. विशेष म्हणजे आता या प्रकरणाबाबत दखल खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली असून त्यांनी याबाबतची जी काही कारवाई असेल त्याची प्रक्रिया करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत.
याबाबतची योग्य ती माहिती म्हाडाच्या उपाध्यक्षकांनी जमवण्याचे आदेश दिलेले असून आता निश्चितच नाशिक गृहनिर्माण महामंडळासमोर याबाबतचा जो काही चुकीचा प्रकार घडत असेल तो समोर आला आहे. त्यामध्ये सुधारणा करून नाशिक महामंडळामध्ये 15000 घरांची सोडत प्रक्रिया सुरू होईल. यासोबतच राज्यातील इतर प्रमुख महामंडळाच्या माध्यमातून अशा प्रकारची घरांची सोडत पार पडेल अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या नागरिकांसाठी यासोबतच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी शासन लवकरच घराची सोडत जारी करेल.
म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा? आणि कागदपत्रे
येथे क्लिक करून पहा