खुशखबर! आता येथे कमी पैशात घेता येणार हक्काचे घर; पहा कोठे आणि कधी असणार घरांची लॉटरी?

MHADA Lottery 2023 : म्हाडाकडून कोकण, पुणे तसेच औरंगाबाद विभागामधील घरांच्या लॉटरीची (Mhada lottery 2023) तयारी सुरू असतानाच आता नागपूर विभागाने देखील लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सोशल मीडिया वर मिळाली आहे. नागपुरमधील जवळपास 700 एवढ्या घरांची (Mhada Flats) जाहिरात दिवाळीच्या दरम्यान प्रसिद्ध होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि म्हाडाची ही लॉटरी डिसेंबर महिन्यात काढली जाणार आहे.

नवीन संगणकीकृत सोडती प्रणाली अवलंबल्याने म्हाडाला सोडतीपूर्वी तसेच सोडतीनंतरची जी काही प्रक्रिया आहे ती आता सुलभ झाली आहे. म्हणूनच यंदा आतापर्यंत मुंबई विभागामधील (4082), कोकण विभागामधील (4654) आणि पुणे विभागामधील (6058) तसेच औरंगाबाद विभागासाठी (936) घरांसाठी लॉटरी काढण्यात आलेली आहे.

येथे वाचा – संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

जवळपास आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. सध्याच्या काळात कोकण मंडळाच्या जवळपास 5 हजार आणि पुणे मंडळाच्या जवळपास 5 हजार तसेच औरंगाबाद मंडळाच्या 600 एवढ्या घरांच्या लॉटरीची (Housing Lottery) जाहिरात करण्याची तयारी सुरू आहे.

नागपूर विभागाचे मुख्याधिकारी महेशकुमार मेघमाळे यांनी सांगितले की, नागपूर विभागाने देखील सोडत (लॉटरी) काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरामधील गणेशपेठ मध्यवर्ती परिसरामध्ये सध्याच्या काळात नागपूर विभागाद्वारे 1 हजार घरे बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये 300 घरांसह इतर काही घरांसाठी देखील लॉटरी काढली जाणार आहे. यामध्ये जवळपास 700 एवढी घरे असणार आहेत आणि यात अत्यल्प, अल्प आणि मध्यम तसेच उच्च अशा सर्व उत्पन्न गटांकरिता घरे असणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहिराती आणि डिसेंबर महिन्यात लॉटरी काढली जाईल अशी माहिती मेघमाळे यांनी दिली.

येथे वाचा – म्हाडाच्या लॉटरीत घर लागले तर ही चूक करू नका! नाहीतर फिरेल तुमच्या स्वप्नांवर पाणी; येथे क्लिक करून पहा माहिती..

Leave a Comment