Mhada Lottery 2023 : आपले स्वताचे घर असावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता ही संधी अजिबात सोडू नका. कारण म्हाडाद्वारे मुंबई, नागपूर आणि पुण्यासाठी लॉटरी सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत म्हाडाच्या घरासाठी अर्ज (Apply MHADA House) केला नसेल तर तुमच्यासाठी सांगू इच्छितो की म्हाडाच्या घरासाठी अर्ज अजून येत्या 25 फेब्रुवारी पर्यंत करता येणार आहे. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी ठेवण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नोंदणी झाल्यानंतर पैसे भरण्याची शेवटची तारीख ही 30 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
याठिकाणी आपण म्हाडाच्या घरासंदर्भात तुमच्या मनात असलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला म्हाडाच्या घरासंदर्भात बरीच माहिती मिळणार आहे. त्यासाठी ही माहिती पूर्ण वाचा..
Mhada Lottery 2023 in Marathi
म्हाडाची घरं मिळवण्यासाठी अर्ज कोठे करावा?
म्हाडाचे घर मिळवण्यासाठी Lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे झाल्यानंतर याठिकाणी अर्ज करावा लागेल. जर तुम्ही अगोदर नोंदणी केली नाही तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही.
म्हाडाचे घर मिळवण्यासाठी अर्ज कोण करू शकतो?
येथे क्लिक करून पहा
म्हाडा लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे? MHADA Lottery Documents in Marathi
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना 7 कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. लॉटरीची ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कागदपत्रांमध्ये ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड आणि त्यावर सध्या राहत असलेला पत्ता टाकावा लागणार आहे. आणि अजून तहसीलदार साहेबांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र असावे. त्यासोबत उत्पन्नाचा दाखला, बॅंकेचे स्टेटमेंट आणि तुम्ही जर जॉब करत असाल तर सॅलरी स्लिप सादर करावी लागेल. जातीचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागणार..
आपण म्हाडाची घरे भाड्याने देऊ शकतो का?
म्हाडाची घरे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणालाही भाड्याने देऊ शकता. तसेच हे घर विकता देखील येते.
सिडकोचे घर असल्यास म्हाडाचे घर घेता येईल का?
याचं उत्तर आहे ‘हो’.. जर तुमच्याकडे सिडकोचे घर असेल आणि तुम्हाला म्हाडाच्या घरासाठी अर्ज अर्ज करायचा असेल तर नक्कीच करता येतो.
म्हाडा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी संपर्क कोठे करावा?
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करतेवेळी काही समस्या येत असेल तर 02226598924 किंवा 9834637538 या नंबरवर संपर्क करू शकता. या क्रमांकावर अर्ज करत असताना येणार्या अडचणी देखील तुम्ही सांगू शकता.
Mhada Mumbai Lottery, Mhada Pune Lottery, Mhada Aurangabad Lottery, Mhada Kokan Lottery 2023 Marathi