काय सांगता! आता म्हाडाकडून दुकानांचा लिलाव; स्वस्तात दुकान घेण्याची संधी, पहा मुंबईत कुठे आहेत म्हाडाची दुकाने?

Mhada lottery 2024 : नवीन वर्षाची ही सुरुवात मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी नक्कीच आनंदात जात आहे. यावर्षी मुंबईत म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार असे सध्या सुरू असलेल्या घडामोडींमूळे दिसत आहे. म्हाडाकडून या नवीन वर्षात सामान्यांना दणदणीत गिफ्ट मिळणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मनात नवनवीन स्वप्न उभे केले जातात. त्यात अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न असते. तर अनेकांचे चांगल्या ठिकाणी प्रॉपर्टी घेऊन गुंतवणूक करण्याचे स्वप्न असते. तुम्ही देखील या नवीन वर्षात तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर म्हाडा तुमचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

Mhada lottery 2024

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे असलेल्या दुकानांचा (Mhada Shops Mumbai) ताटकळलेला लिलाव अखेर आता पूर्ण होणार आहे. पुढील काळात ई ऑक्शन या पद्धतीने हा लिलाव पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये असलेल्या 170 एवढ्या दुकानांसाठी हा लिलाव होणार आहे. यासाठी आता जानेवारी महिन्याच्या शेवटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लिलावामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांसाठी 25 कोटी ते 13 कोटी रुपये एवढी बोली रक्कम म्हाडाच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आली आहे. 

कुठे किती दुकाने? (Mhada Shops Mumbai)

कांदिवली येथे – 12 दुकाने,
मालवणी येथे – 57 दुकाने,
मागाठाणे येथे – 12 दुकाने,
चारकोप येथे – 34 दुकाने,
बिबिंसारनगर आणि गोरेगाव येथे – 17 दुकाने,
तुंगा आणि पवई येथे – 3 दुकाने,
गव्हाणपाडा व मुलुंड येथे – 8 दुकाने,
स्वदेशी मिल येथे – 5 दुकाने,
प्रतीक्षानगर व शीव येथे – 15 दुकाने

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाच्या वतीनं या दुकानांच्या लिलावासाठी जाहिरात (MHADA Auction Advertisement) प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर इच्छुक लोकांना अनामत रक्कमेसह अर्ज करता येईल. अर्ज घेण्याची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हाडाकडून त्यांची छाननी केली जाणार आहे. आणि पात्र अर्ज वेगळे करण्यात येतील आणि फेब्रुवारी महिन्यात ई लिलाव पार पडेल अशी माहिती मिळाली आहे. या ई लिलावामध्ये जास्तीची बोली लावणारा अर्जदार दुकानाचा ताबा घेण्यास पात्र असणार आहे, त्यानंतर पुढे त्याला प्रक्रियेच्या नुसार दुकान वितरित केले जाईल. महत्त्वाचं म्हणजे म्हाडाकडून या ई लिलावामध्ये 9 ते 200 मीटरपर्यंतच्या दुकानांचा समावेश असणार आहे. 

मुंबईकरांनो! तयारीला लागा; आता पुन्हा एकदा स्वस्तात म्हाडाचे घर घेण्याची संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment