मुंबईकरांनो! या दिवशी जाहीर होणार म्हाडाची लॉटरी, पहा 800 चौरस फूट घराची किंमत..!

Mhada Lottery 2024 : जर तुम्हाला आगामी म्हाडा लॉटरीत सहभागी व्हायचं असेल तर येत्या काही दिवसांमध्ये लॉटरी संदर्भात महत्त्वाची घोषणा होणार असून, आता या लॉटरीत हक्काच्या घराच्या चाव्या कोणाच्या हातात येतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

म्हाडाचा फ्लॅट आणि म्हाडाची लॉटरी हे दोन शब्द कानावर पडताच अनेकांची घर घेण्याची इच्छा जागृत होते. त्यामागचे कारण म्हणजे मुंबई-पुण्यात सामान्य माणसासाठी हक्काचे घर खरेदी करणे अवघड झालेले असताना मात्र म्हाडाकडून खिशाला परवडेल अशा किमतीच्या घरांची लॉटरी काढली जाते.

सामन्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात म्हाडाची घरं (Mhada Flats) आजपर्यंत अनेक लॉटरीतून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता पुन्हा 2024 च्या आगामी लॉटरीची यात भर पडणार असून या लॉटरीमूळे हजारो लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या आगामी लॉटरीची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली असतानाच आता या लॉटरीतील काही घरांच्या किमती ऐकून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.

अरे वा! असा असेल म्हाडाचा गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट, येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..!

794 चौरस फूट घराची किंमत..

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत असलेल्या गोरेगावमधील प्रेमनगर भागात म्हाडाकडून 332 एवढ्या घरांचा प्रकल्प उभारण्याची सुरू आहे. पण या घरांच्या किंमती नेमक्या किती असणार अशी उत्सुकता लागून बसली होती. आता या घरांच्या किमती अचानक प्रकाशझोतात आल्यामूळे बऱ्याच चर्चा आणि कुतूहलाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. म्हाडा लॉटरीतील मध्यम उत्पन्न गटामधील 794 चौरस फूट एवढ्या क्षेत्रफळाच्या घरासाठी तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये एवढी किंमत आकारण्यात येणार आहे आणि उच्च उत्पन्न गटासाठी 979 चौरस फूट एवढ्या क्षेत्रफळाच्या घरासाठी 1 कोटी 40 लाख रुपये एवढी रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. 

काय सांगता! आता ‘या’ लोकांना घरासाठी घेतलेला हप्ता वापस करावा लागणार, येथे क्लिक करून पहा लिस्टमध्ये नाव..!

इमारतीचं स्वरुप नेमकं कसं असणार? 

म्हाडाची गोरेगावमधील प्रेमनगर भागात हे फ्लॅट असणारी 39 मजली गगनचुंबी इमारत सध्या अंडर कन्स्ट्रक्शन असून, या इमारतीचे काम या वर्षअखेरीस पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस म्हाडाची ही आगामी लॉटरी जाहीर करण्यात येणार असून या लॉटरीत कोटी रुपये किमती असणार्‍या घरांचा समावेश असणार आहेत.

इमारतीत मिळणार या सुविधा.. 

कोट्यवधी किमतीची घरे असलेल्या या इमारतीत स्विमिंग पूल, क्लब हाऊस आणि पोडियम पार्किंग अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. आता म्हाडाच्या या ‘ड्रीम मॉडेल’ ला नेमका कसा प्रतिसाद मिळवतो हे पाहण्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्राचं देखील लक्ष असणार आहे.

येथे वाचा – खुशखबर! आता मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर मिळणार; म्हाडाच्या 3600 घरांबद्दल मोठी बातमी..!

Leave a Comment