खुशखबर! आजपासून म्हाडा लॉटरीसाठी करा अर्ज; 4777 घरांची लॉटरी जाहीर, पहा अर्ज कुठे करावा?

म्हाडाचे स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना आजपासून म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा म्हाडाचे घर (Mhada Flats) घेण्याची संधी सामान्यांना मिळाली आहे. आता मुंबई आणि पुण्यात वारंवार म्हाडाकडून लॉटरी (Mhada Lottery Mumbai) काढण्यात येत असल्याने या शहरांमध्ये हक्काचे घर घेणे सामान्यांना सोपे झाले आहे. आज दुपारी 3 वाजेपासून म्हाडाच्या तब्बल 4 हजार 777 एवढ्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. म्हाडाची ही घरे कुठे आहेत? आणि अर्ज कुठे करावा? तसेच या लॉटरी संदर्भात महत्त्वाच्या तारखा याठिकाणी आपण पाहणार आहोत.

फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाची ही घरे कुठे आहेत? (Mhada Flats)

म्हाडाच्या पुणे मंडळाकडून (Mhada Pune) विविध उत्पन्न गटामधील पुणे, सोलापूर, कोल्हापूर सातारा तसेच सांगली या पाच जिल्ह्यांत असलेल्या तब्बल 4 हजार 777 एवढ्या घरांसाठी सोडत (Mhada Lottery) जाहीर करण्यात आली आहे. यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे 745 एवढे आणि 561 एवढ्या घरांचा समावेश आहे. या सोडतीचा प्रारंभ पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते म्हाडाच्या कार्यालयात गुरुवार रोजी करण्यात आला. यावेळी म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील हे देखील उपस्थित होते.

काय सांगता! मुंबईत म्हाडाचे गाळे खरेदीसाठी मोठी झुंबड; किंमत फक्त एवढी, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज कुठे करावा?

आज दुपारी तीन वाजेपासून म्हाडाच्या 4 हजार 777 घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या लॉटरीसाठी अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी www.mhada.gov.in या संकेतस्थळा भेट द्यावी किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. महत्त्वाचं म्हणजे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

लॉटरी संदर्भात महत्त्वाच्या तारखा

कालपासून (7 मार्च) नोंदणीला सुरुवात झाली असून आज (8 मार्च) दुपारी 3 वाजेपासून लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी 8 एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज 10 एप्रिल रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरू असणार आहे. अर्जाचा ऑनलाइन शुल्क भरणा 12 एप्रिलपर्यंत करता येणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

Leave a Comment