घरांची लॉटरी काढण्यासाठी ‘म्हाडा’ला मुहूर्त मिळाला? पहा काय आहे नवीन अपडेट..!

मुंबई : मुंबईत म्हाडाकडून लॉटरीच्या (Mhada lottery Mumbai) माध्यमातून परवडणाऱ्या दरात घरे मिळत असल्याने अनेकांना म्हाडा लॉटरीची (Mhada lottery) प्रतीक्षा असते. त्यामुळे अनेक जण म्हाडाची लॉटरी कधी काढली जाणार असे विचारत असतात. म्हाडाने आतापर्यंत अनेक लॉटरी काढून नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि आता पुढील नवीन वर्षात देखील म्हाडाकडून लॉटरी काढली जाण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या माध्यमातून ठाणे शहर व जिल्हा तसेच सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर येथील वेगवेगळ्या हाऊसिंग योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार 311 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाणार आहे. 

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5 हजार 311 एवढ्या घरांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या घरांची लॉटरी 13 डिसेंबरला काढण्याचा निर्णय झाला होता, पण काही प्रशासकीय कारणांमुळे घरांची ही लॉटरी पुढे ढकलली गेली. आणि अजूनपर्यंत ही लॉटरी काढण्यासाठी मुहूर्त मिळालेला नाहीये. आता डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात ही लॉटरी काढली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी अजूनपर्यंत म्हाडा प्राधिकरणाकडून तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

लॉटरी संदर्भात काही महत्वाची माहिती (Mhada Konkan Lottery)
 
(1) या लॉटरीची तारीख अर्जदारांना आपल्या मोबाईलवर SMS च्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे. 

(2) म्हाडाच्या या लॉटरीसाठी 15 सप्टेंबर पर्यंत लॉटरीसाठी एकूण ऑनलाईन 30,687 अर्ज प्राप्त तर
अनामत रकमेसह एकूण 24, 303 एवढे अर्ज प्राप्त

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

लॉटरी पाच घटकांमध्ये विभागली आहे –

PM आवास योजनेअंतर्गत 1,010 एवढी घरे (Mhada Flats)

एकात्मिक गृहनिर्माण योजनेच्याअंतर्गत 1,037 एवढी घरे

सर्वसमावेशक योजनेतील 919 एवढी घरे

टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्याकरिता 67 एवढी घरे

Leave a Comment