मुंबईकरांसाठी खुशखबर! कुलाबा येथे म्हाडाची 10 हजार घरांची लॉटरी, पहा बातमी..!

2 BHK Flat Mumbai : मुंबई नगरीत स्वतःचं घर (mumbai 2 bhk flat) असावं असं प्रत्येक मराठी माणूस स्वप्न पाहत असतो. याशिवाय दक्षिण मुंबईमध्ये घर विकत घेण्याचे स्वप्न पाहणे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. पण, आता एक मोठी खुशखबर आहे, आता थेट दक्षिण मुंबईमध्ये घर (3 bhk flat in mumbai) विकत घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आता म्हाडाची घरे थेट दक्षिण मुंबईत (Mhada Flat Mumbai) बांधण्यात येणार आहेत. कुलाब्यामधील 10 हजार घरांसाठी म्हाडा लवकरच लॉटरी (Mhada lottery mumbai) काढणार आहे. सोशल मीडिया वरून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेचे अध्यक्ष एड.राहुल नार्वेकर यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पाकरिता मुंबईमधील कुलाबा याठिकाणी 4 एकर जागा उपलब्ध झाली आहे. याठिकाणी संक्रमण शिबिराचा भूखंड विकसित केला जात आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींत राहत असलेल्या लोकांना 40 वर्षांच्यानंतर स्वतः चे हक्काचे घर मिळणार आहे. याठिकाणी म्हाडा 4 एकर जागेवरती बिल्डिंग बांधू शकते, यामाध्यमातून येथे 10 लाख स्क्वेअर फूट एवढे बांधकाम होऊ शकते. या प्रकल्पाच्या माध्यमातून कुलाब्यासारख्या भागामध्ये 10 हजार सदनिका सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे.. ही चांगली संधी गमावू नका..

या घरांचे बांधकाम संपल्यानंतर लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये ही घरे (Flats in Mumbai) मोक्याच्या ठिकाणी असल्यामूळे या लॉटरीला प्रचंड प्रतिसाद मिळेल असं बोलण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या किमती लॉटरी जाहीर झाल्यानंतरच पुढे येतील.

30 लाखात घेतलेले घर 50 मध्ये विकण्याची इच्छा ? तर मग याठिकाणी मिळणार मोठी संधी..

ठाण्यामध्ये 10 ते 44 लाखांपर्यंत फ्लॅट | 2 BHK Flat Mumbai and Thane

कोकण मंडळाच्या माध्यमातून नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे याठिकाणी मोक्याच्या ठिकाणी घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. घरांच्या लॉटरीची जाहिरात (Flat lottery ad) प्रसिद्ध झाली आहे. विशेष यात ठाण्यामधील घरांच्या किमती 10 ते 44 लाख रुपये यादरम्यान आहे. तुम्ही जर आतापर्यंत या घरांसाठी अर्ज केला नसेल तर म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ अर्ज करता येणार आहे.

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत मोठा बदल;

कोकण मंडळ सोडत वेळापत्रक (Konkan Lottery 2023)

(1) ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 15 नोव्हेंबर रात्री 11:59 पर्यंत…

(2) ऑनलाइन अनामत रक्कम ही 17 नोव्हेंबर पर्यंत रात्री 11:59 पर्यंत भरता येईल..

(3) 17 नोव्हेंबर पर्यन्त बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये अनामत रकमेचा भरणा करता येईल..

(4) सोडतीकरिता आलेल्या अर्जांची प्रारूप यादी 4 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल..

(5) सोडतीकरिता स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 11 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजेला प्रसिद्ध करण्यात येईल…

बाप रे! घर खरेदी केल्यानंतर फक्त रजिस्टर झालं म्हणून निवांत राहू नका; इथे पण करा नोंद.. अन्यथा होईल फसवणूक.. !

Leave a Comment