खुशखबर! म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी मिळेल लोन, जाणून घ्या कामाची माहिती..!

Mhada Lottery Home Loan : राहण्यासाठी स्वतःचे घर असणे ही एक मुलभूत गरज आहे. जर राहण्यासाठी घर नसेल तर आपल्या जीवन जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. घर नसेल तर शांततेत जीवन जगायला मिळत नाही, आपली गोपनीयता सार्वजनिक ठिकाणी येऊन पडते. घर भाड्याचे असले तर त्या घरात आपण पाहूने असल्या सारखा भास होतो. त्यामूळे चांगले व स्वाभिमानी आयुष्य जगण्यासाठी आपले स्वतःचे घर असणे अत्यंत आवश्यक आहे. आता नागरिकांचे हे घराचे स्वप्न म्हाडा (MHADA House Lottery 2023) अंतर्गत पूर्ण केले जात आहे.

Mhada Lottery Home Loan

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करून आपले स्वतःचे घर मिळवता येते. स्वस्त दरात सामान्य नागरिकांना घर उपलब्ध व्हावे यासही म्हाडा लॉटरी (MHADA Lottery 2023) काढण्यात येते. तुम्ही जर म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लॉटरीत तुम्हाला घर मिळाल्यास आता त्यावर तुम्ही लोन (Mhada Lottery Home Loan) मिळवू शकता. बँक तुम्हाला म्हाडाच्या घरावर 8 ते 10 टक्के या व्याजदराने होम लोन उपलब्ध करून देऊ शकते.

येथे पहा – अरे वा! म्हाडाची घरं पाहून तुम्ही व्हाल खुश, कमी किंमतीत मिळणार्‍या घरांचा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा..!

आणि महत्त्वाचं म्हणजे या घरांच्या ज्या किमती आहे त्या सामान्य माणसाला परवडेल अशा आहे. PM आवास योजनेचा (PM Awas Yojana) लाभ म्हाडाच्या घरांसाठी सुद्धा मिळतो. म्हाडाच्या घरांचा लाभ वेग वेगळ्या गटांनुसार दिला जातो, जसे की अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट अशा या श्रेणी निर्माण केल्या आहे.

लवकरच म्हाडाच्या 4752 घरांची सोडत होणार आहे. याचा मुहूर्त देखील ठरला आहे. पुणे तसेच औरंगाबाद मंडळानंतर आता कोकण मंडळासाठी म्हाडाची घर लॉटरी (MHADA House Lottery) सुरू होणार आहे. महत्वाची माहिती अशी की फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच या महिन्यात शेवटच्या काही दिवसांमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळासाठी (MHADA Lottery Kokan 2023) अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या घरासाठी लोन कोणत्या बँकेतून घ्यावे? आणि कागदपत्रे
येथे क्लिक करून पहा