खुशखबर! म्हाडाकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट; पुण्यात तब्बल एवढ्या घरांसाठी लॉटरी, पुण्यात म्हाडाचे घर घेण्याची मोठी संधी..!

Mhada Lottery Pune : म्हाडाने आता पुणेकरांना मोठे गिफ्ट दिले आहेत. लोकसभेच्या तोंडावर तब्बल 1700 घरांची सोडत काढली जाणार असल्याने सामान्यांना पुण्यात म्हाडाचे घर (Mhada Flats Pune) मिळणार आहे. पुणे शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्या खूप महत्वाचे शहर आहे. पुण्यात देशभरातून मुले-मुली शिकण्यासाठी, जॉब करण्यासाठी तसेच व्यवसाय करण्यासाठी येतात. पुण्यात मोठ मोठ्या आयटी कंपन्या असल्याने रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामूळे पुण्यात मुंबई प्रमाणे घरांची मोठी मागणी आहे. पुण्यात स्वस्त घर मिळावे यासाठी अनेक जण म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा करतात. पण आता लॉटरीसाठी असलेली तुमची प्रतीक्षा संपणार असून आता पुण्यात म्हाडाकडून 1700 घरांची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार? याची माहिती आपण पाहणार आहोत.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

मिळालेल्या माहितीनुसार 1700 घरांची ही सोडत म्हाडा पुणे विभागाकडून 20 टक्के योजनेंतर्गत काढली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील महिन्याच्या (मार्च महिन्याच्या) पहिल्या आठवड्यामध्ये सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन आचारसंहितेच्या आधी म्हाडाच्या या घरांसाठी (Mhada Flats) सोडतची प्रक्रिया सुरु करण्याचे म्हाडाकडून नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईत चक्क 323 स्क्वेअर फुटामध्ये 2 BHK फ्लॅट; किंमत पाहिली का? येथे क्लिक करून पहा बातमी..

आचारसंहितेच्या कालावधी दरम्यान अर्ज मागवून त्यानंतर सोडत काढण्यात येणार आहे. आचारसंहितेच्या कालावधीचा अशा पद्धतीने उपयोग म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

सामान्य लोकांना कमी किमतीत घरे मिळवून देण्यासाठी पुण्यामध्ये आता सरकारी मालकीच्या किंवा म्हाडाच्या मालकीच्या जागा उपलब्ध नाहीत. पण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीमधील जिल्ह्यात असलेल्या विविध ठिकाणी रहिवाशी क्षेत्राकरिता जागा आरक्षित आहेत. आता यातील काही जागा मिळविण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात पत्रव्यवहार देखील सुरू आहे.

म्हाडाचे घर मिळवण्यासाठी काही ट्रिक असते का? लॉटरीत घर लागण्यासाठी काय करावे? येथे क्लिक करून पहा माहिती..!

Leave a Comment