एवढ्या नागरिकांना पाहिजे म्हाडाचे घर; या तारखेला होणार ड्रॉ.. पहा सोडतीचे वेळापत्रक..!

Mhada Lottery Pune : म्हाडातर्फे पुणे विभागामधील जवळपास 5 हजार 863 एवढ्या सदनिकांची सोडत (Flat Lottery) काढली जाणार असून त्याकरिता 59 हजार 766 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. आणि ही सोडत याच महिन्यात 24 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्याची अशी महत्वाची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांच्याकडून मिळाली आहे. प्रमाणपत्रांची वेळेत पूर्तता न झाल्याने नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाला असल्याने अर्ज करण्याच्या कालावधीत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

या सोडतीमध्ये म्हाडाच्या पुणे (Mhada Pune) विभागामधील पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांतील गृहनिर्माण योजनेमधील 403, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेमधील 2 हजार 445, पंतप्रधान आवास योजनेमधील 431 आणि 15 टक्के सामाजिक गृह योजनेमधील 344 तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 2 हजार 445 सदनिका अशा एकूण 5 हजार 863 एवढ्या सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्याकरिता 5 सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात आले.

खुशखबर! आता घ्या चॉईस फॉर्म भरून पाहिजे तिथे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

अर्जासह अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण वर्गामधून अर्ज करणार आहे त्याचे प्रमाणपत्र असे महत्वाचे पुरावे ऑनलाईन अर्जाच्यासोबत देणे बंधनकारक केले होते. म्हणून छाननी प्रक्रियेत अर्ज बाद नाही होणार, असा दावा प्रशासनाने केला होता. पण, प्रमाणपत्रे उशीरा मिळाल्याने नागरिकांचा या सोडतीसाठी कमी प्रतिसाद मिळाला.

अरे वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर, फक्त वापरा ही ट्रिक, येथे क्लिक करून पहा बातमी..

हे लक्षात घेऊन सोडतीकरिता भरल्या जाणार्‍या अर्जांसाठी दोन वेळा मुदतवाढ दिली गेली. ही मुदत गेल्या महिन्यात 31 तारखेला संपली असून या कालावधीत म्हाडाकडे 77 हजार 280 अर्जदारांनी अर्ज केले आहे. त्यापैकी 59 हजार 766 एवढ्या अर्जदारांनीच अनामत रक्कम भरलेली आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरलेले अर्जदारच म्हाडाच्या या सोडतीसाठी पात्र ठरले आहेत.

मुंबईत ऑफर्सचा धमाका! फक्त 10 टक्के रक्कम भरून घेता येणार घर, पहा बातमी..!

सोडतीचे वेळापत्रक (Mhada Lottery)

(1) अर्जाची प्रारुप यादी – 8 नोव्हेंबर
(2) हरकती नोंदण्याची मुदत – 11 नोव्हेंबर पर्यंत
(3) अंतिम यादी – 20 नोव्हेंबर
(4) सोडत – 24 नोव्हेंबर

Leave a Comment