म्हाडासाठी पहिल्यांदाच करताय रजिस्ट्रेशन! तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; पहा सविस्तर;

Mhada lottery 2023 : नमस्कार आता लवकरच तुमच्या घरांची स्वप्न पूर्तता होणार आहे. कारण तुम्ही 16 लाख रुपयांपासून 44 लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी म्हाडा अंतर्गत त्वरित अर्ज करू शकता. आता पुढील काही दिवसांपासूनच म्हणजे 11 सप्टेंबर पासून तुम्ही म्हाडाच्या कोकण मंडळासाठी अर्ज करू शकता. एकदाच रजिस्ट्रेशन करून तुम्ही म्हाडा साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता (Mhada lottery registration). जर तुम्ही म्हाडाच्या घराचा आधीच लाभ घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज सादर करता येणार नाही, ही बाब लक्षात ठेवावी.

तुम्हाला जर म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही म्हाडाच्या housing.mhada.gov.in या हाउसिंग लॉटरीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता (MHADA lottery 2023). या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात प्रथम लॉगिन व रजिस्ट्रेशन असे पर्याय तुम्हाला दिसणार आहेत. जर पहिल्यांदाच या वेबसाईटवर गेला असाल तर रजिस्ट्रेशन बटणावर क्लिक करून त्वरित रजिस्ट्रेशन करून घ्यावे.

रजिस्ट्रेशन करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तो पर्याय निवडल्यानंतर तुम्ही पुढे विचारल्याप्रमाणे संपूर्ण माहिती अगदी बिनचूकता भरावी. यासोबतच आपला आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे व आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक सुद्धा त्या ठिकाणी द्यावयाचा आहे (MHADA lottery online apply). सर्व माहिती शेवटी सबमिट करावी त्यानंतर पुढे तुमच्या नोकरीचे डिटेल्स यासोबतच पगार किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्याची डिटेल्स त्या ठिकाणी भरावी. तुम्हाला जर कोट्यातून घर उपलब्ध करायचे असेल तर त्याची माहिती व आवश्यक कागदपत्रे एकत्रितरित्या जमा करावीत..

म्हाडाचे घर घेत असताना या चुका टाळाव्यात;

रजिस्ट्रेशन करत असताना सर्वात प्रथम तुमचे नाव यासोबतच पत्ता आणि तुमच्या कामाची संपूर्ण माहिती अगदी तपशीलवार पणे भरावी. यामध्ये थोडीफार चूक झाली तरी म्हाडाच्या घरापासून तुम्ही वंचित राहू शकतात.

त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन व पेमेंटचे रिसीट डाऊनलोड करून घ्यायचे आहे. यासोबतच हे रिसीट हरवू नये म्हणून तुम्ही मेलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता (what is mhada lottery scheme). जर तुम्ही हार्ड कॉपी गमावली तरी तुमच्याकडे ही सॉफ्ट कॉपी असणार आहे.

फाईल तयार करत असताना सर्वात प्रथम तीन फायली तयार करायच्या आहेत. एक बँकेसाठी तयार करायची, दुसरी फाईल म्हाडा ऑफिस साठी व तिसरी फाईल बॅकअप म्हणून तुमच्याकडे ठेवावी.

सगळ्या डॉक्युमेंट्स या ओरिजनल असाव्यात यासोबतच झेरॉक्स ची ट्रू कॉपी सुद्धा करून घ्यायचे आहे (benefits of mhada lottery). कागदपत्रातील जी माहिती आहे ती तुम्ही दिलेल्या माहितीशी जुळणारे असावी. अन्यथा त्या ठिकाणी तुमचे नाव नाकारले जाऊ शकते.

अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे;

म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करत असताना काही महत्त्वाचे आवश्यक कागदपत्रे लागतील (MHADA lottery documents required). त्यामध्ये तुमचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, यासोबतच अर्जदाराचे पासपोर्ट बँक खाते, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन, इत्यादी कागदपत्र अर्ज करताना लागतील. अशा प्रकारे म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे…

Leave a Comment