Mhada Mumbai : एकाच व्यक्तीस म्हाडाची 2 घरे घेता येतील का? कशी असेल अर्ज प्रक्रिया? पहा म्हाडाचे नियम;

मुंबई : म्हाडा अंतर्गत तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. म्हाडा मंडळाने यंदाच्या वर्षी त्यांच्या विविध नियमांमध्ये बदल केले आहेत. यापूर्वी तब्बल 21 कागदपत्रे नागरिकांना सादर करावी लागत होती परंतु फक्त सातच कागदपत्रात संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे (mhada lottery 2023). नोंदणीच्या वेळीच ही सात कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागतील. या प्रक्रियेची संपूर्ण पडताळणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून पुढे लॉटरी साठी जमा होईल.

11 सप्टेंबर 2023 पासूनच म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी व अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. शेवटची तारीख ही ऑगस्ट महिन्याची असेल (mhada lottery registration). त्यामुळे अद्याप कोणी या म्हाडाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले नसेल तर सप्टेंबर महिन्यात अर्ज करून त्वरित सहभागी व्हावे आणि नोंदणी करून घ्यावी.

म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच तुम्ही वेगवेगळ्या शहरांसाठी आणि वेगवेगळ्या घरांसाठी देखील अर्ज करू शकता (mhada lottery rules in marathi). जर तुमच्याकडे मुंबईत म्हाडाचे घर असेल तर अशावेळी तुम्ही इतर विभागासाठी सुद्धा अर्ज करू शकता. म्हणजेच पुणे कोकण नागपूर अशा ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल..

असे असेल तर म्हाडाचे घर मिळणार नाही;

जर तुम्ही आधीच म्हाडाचे घर घेतले असेल तर तुम्हाला दुसरे घर अजिबात घेता येणार नाही (mhada lottery information). तसेच पती-पत्नीने म्हाडाचे घर घेतले असेल तर ते दोघेजण त्या घराचे मालक असतात त्यामुळे म्हाडाचे घर पतीच्या नावावर असल्यास पत्नीने अर्ज केल्यास पत्नीला पुन्हा घर मिळू शकणार नाही.

मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरांमध्ये तुम्ही स्वातंत्रपणे या घरासाठी अर्ज केला असेल तर नक्कीच तुम्हाला दोन्ही ठिकाणी घर घेता येते. त्या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे सादर करावी लागतील. म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेची सोडत ही पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काढली जाते. याशिवाय तुम्ही म्हाडाच्या ॲप्लीकेशन वरून सुद्धा त्वरित अर्ज सादर करू शकता..

म्हाडा अंतर्गत 2 फ्लॅटसाठी अर्ज करता येतो का?

जर एखाद्या व्यक्तीने एक फ्लॅट घेतला असेल तर अशावेळी त्याच्या आईने प्रतिज्ञापत्र शपथ सादर केले तर दुसऱ्या फ्लॅटसाठी अर्ज करत असताना तिच्याकडे फ्लॅट नसल्याचा दावा तिला करता येतो आणि अशा माध्यमातून दुसरे घर घेता येते. परंतु म्हाडाच्या कायद्यानुसार हे वाटप रद्द सुद्धा होऊ शकते.

Leave a Comment