अरे वा! असा असेल म्हाडाचा गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट, येथे पहा सॅम्पल फ्लॅट..!

Mhada Flats Goregaon : मुंबईकरांनो! आता म्हाडा हक्काच्या घरांसह आलिशान सुविधा (Luxury amenities) गिफ्ट देणार आहे. आता म्हाडाकडून ‘पहाडी गोरेगाव’ याठिकाणी मध्यम उत्पन्न गटाकरिता आलिशान सुविधांनी सुसज्ज असलेल्या 2 बीएचके सदनिकांचा (2 BHK Flats) शानदार गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. चला पाहू या घरांची एक झलक..

मुंबईत बजेटमध्ये हक्काचं घर मिळावं आणि तेही पंचतारांकीत सोसायटीमध्ये अशी अनेकांची इच्छा असते. आता मुंबईकरांची ही इच्छा म्हाडा पूर्ण करणार आहे. कारण आता मुंबईमधील गोरेगाव येथे असलेल्या म्हाडाच्या पंचतारांकित इमारतीचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. म्हाडाने गोरेगाव येथे प्रथमच 39 मजली निवासी इमारतीचे बांधकाम केले आहे. विशेष म्हणजे या इमारतीतील रहिवाशांना पंचतारांकित सुविधा दिल्या जाणार आहे.

या गृहप्रकल्पा सर्व आवश्यक असलेल्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यात मैदान, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, जिम आणि जलतरण तलाव अशा सुविधांचा समावेश असणार आहेत. या प्रकल्पात तुम्हालाही घर घेण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर मिळवण्यासाठी काही ट्रिक असते का? लॉटरीत घर लागण्यासाठी काय करावे? पहा माहिती..!

म्हाडाच्या या निर्णयाचा फायदा ध्यमवर्गीयांना होणार असून एक चांगला पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध होत आहे. म्हाडाने या 39 मजली इमारतीतील उच्च तसेच मध्यम गटातील ईच्छुकांसाठी लॉटरी (Mhada Lottery) काढण्याचा निर्णय घेतला असून आता येणार्‍या सोडतीत या घरांचा समावेश करण्यात येणार आहे.

येथे पहा गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट, खालील व्हिडिओ पहा..

Leave a Comment