अरे वा! आता मुंबईत सरकारी योजनेतून मिळवा प्लॉट; पहा किंमती आणि लोकेशन..!

म्हाडाकडून मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) घेता येतं, हे सर्वांना माहिती आहे. पण म्हाडाकडून प्लॉटची विक्री केली जाते, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हाडाकडून वारंवार मुंबईत घरांच्या योजना (Housing Schemes Mumbai) जाहीर केल्या जातात. या योजनांना नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळतो. सर्वसामान्य अर्जदार या योजनांचा लाभ घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येतात. आता घरांच्या योजनेप्रमाणे म्हाडाकडून दुकानांची आणि प्लॉटची योजना आणली जात आहे. अलीकडेच म्हाडाने प्लॉटची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे आता म्हाडा या सरकारी योजनेतून मुंबईत प्लॉट (Plots Scheme Mumbai) घेता येणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 17 भूखंडांचा म्हणजेच प्लॉटचा ई लिलाव करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे बर्‍याच वर्षांनंतर म्हाडाकडून प्लॉटची योजना जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हे प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबईतील पाच नोड्समध्ये हे प्लॉट असून यात मालवणी, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवारनगर (विक्रोळी), जोगेश्वरी, कांदिवली आणि प्रतीक्षानगर या पाच नोड्सचा समावेश आहे. वेगवेगळ्या वापरासाठी म्हाडाचे हे 17 प्लॉट्स आरक्षित आहे. यातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला कोट्यावधी रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

म्हाडाच्या प्लॉटची किंमत किती?

मुंबई मंडळाने 173 दुकानांच्या योजनेनंतर आता 17 प्लॉटची योजना जाहीर केली आहे. यातील 9 प्लॉट्स हे मालवणी येथे आहे, कांदिवली येथे एका प्लॉटची विक्री होणार आहे, टागोरनगरमध्ये 3 आणि कन्नमवार नगरमध्ये असलेल्या 2 प्लॉटचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. तसेच जोगेश्वरी आणि प्रतीक्षा नगरमधील प्रत्येकी एका प्लॉटचा यात समावेश आहे. वेगवेगळे क्षेत्रफळ असलेले हे प्लॉट असून या प्लॉटसाठी मुंबई मंडळाकडून एक आधारभूत किंमत ठरवण्यात आली आहे. कमीत कमी 45 हजार 300 रुपये प्रति चौरस मीटर ते जास्तीत जास्त 1 लाख 6 हजार 170 रुपये प्रति चौरस मीटर अशी आहे.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

या बोलीपेक्षा सर्वात जास्त बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहे. या ई-लिलावामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के एवढी अनामत रक्कम अदा करावी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे या फ्लॅटच्या ई-लिलावासाठी 24 एप्रिलपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.

खुशखबर! नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी सिडकोची 243 दुकाने उपलब्ध, येथे क्लिक करून पहा माहिती..!

Leave a Comment