मुंबईत म्हाडाचा प्लॉट सामान्य माणूस घेऊ शकतो का? काय असू शकते किंमत? मुंबईकरांनो पहा बातमी..!

Mhada Plots Mumbai : काही लोकांचे मुंबईत घर (2 BHK flat Mumbai) घेण्याचे स्वप्न असते, तर काहींचे मुंबईत प्लॉट (Plot in Mumbai) घेण्याचे स्वप्न असते. मुंबईत जागेची कमतरता असल्यामुळे इथे प्लॉट मिळणे सोपे नाही असही बर्‍याचदा बोललं जातं. या या व्यक्तीने मुंबईत घर घेतले असं अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळतं, पण कोणी मुंबईत प्लॉट घेतला असं खूपच कमी ऐकायला मिळतं. त्याचं कारण म्हणजे इथे असलेली जागेची कमतरता तसेच भरमसाठ प्लॉटच्या किमती. म्हणूनच लोक मुंबईत फ्लॅट (2 BHK Flat Mumbai) घेतात. पण आता तुम्हाला मुंबईत प्लॉट घेण्याची मोठी संधी मिळत आहे. आता म्हाडाकडून प्लॉटच्या लिलावासाठी जाहिरात काढली जाणार आहे. मुंबईमध्ये हे म्हाडाचे प्लॉट (Mhada Plots Mumbai) वेगवेगळ्या भागांमध्ये असणार आहेत, अशी माहिती म्हाडाकडून मिळाली आहे. पण मुंबईतील म्हाडाचा हा प्लॉट सामान्य माणूस घेऊ शकतो का? आणि त्याची किंमत काय असू शकते?

प्लॉट घेऊन आपल्या इच्छेनुसार त्या जागेवर बांधकाम करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण प्लॉटचा शोध घेतात. पण मुंबईत प्लॉट मिळणे अवघडच मानले जाते. आता म्हाडाकडून प्लॉटचा लिलाव करण्यात येणार असल्याने मुंबईत प्लॉटचा शोध घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

सामान्य माणूस म्हाडाचा प्लॉट घेऊ शकतो का?

आता म्हाडा मुंबई मंडळाने प्लॉटचा लिलाव करण्यासाठीची महत्वाची योजना आखलेली दिसते. जो व्यक्ती म्हाडाला सर्वाधीक ऑफर देणार त्याला तो प्लॉट दिला जाणार. या प्लॉटची किंमत त्याच्या क्षेत्रानुसार आणि लोकेशननुसार ठरवली जाणार असल्याचं ऐकायला मिळतंय. असे असले तरीही या प्लॉटच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच असतील असा अंदाज एका अभ्यासकाने वर्तवला आहे.

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

मुंबईतील काही म्हाडाचे प्लॉट शाळा, मोठी कॉलेज, हॉस्पिटल आणि खेळाची मैदाने यासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील अनेक प्लॉट बर्‍याच वर्षांपासून खाली अवस्थेत पडून आहेत. त्यावर अजून काहीही बांधकाम कार्य झालेले नाही. परिणामी यावर अतिक्रमण होत असते. म्हणूनच या समस्या सोडवण्यासाठी म्हाडाकडून काही अटी व शर्तीसह आपले प्लॉट विकण्याची योजना आखली आहे. 

Leave a Comment