म्हाडाचे प्लॉट्स स्वस्त होणार की महाग? पहा म्हाडाच्या प्लॉट संदर्भात महत्त्वाची अपडेट..!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने (Mhada) आपल्या भाडेपट्ट्यात वाढ केली आहे आणि त्यापाठोपाठ आता वसाहतीत असलेल्या फुटकळ भूखंड (Plots) विक्रीच्या धोरणामध्ये देखील बदल करण्याचे ठरविले आहे. आता यापुढे फुटकळ भूखंडाची विक्री करण्यात येणार असून रेडी रेकनरच्या (Ready Reckoner) शंभर टक्के दर निश्चित केला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

फुटकळ भूखंड म्हणजे काय?

बीडीडी चाळ प्रकल्पामुळे म्हाडाच्या तिजोरीवर ताण आलेला आहे, हा ताण कमी करण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महसुलात वाढ करण्यासाठी म्हाडाने प्रयत्न सुरु केले असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या 104 अभिन्यासात बरेच फुटकळ भूखंड पडून आहेत. ज्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करता येत नाही, अशा भूखंडांना फुटकळ भूखंड म्हटले जाते.

पुनर्विकास करताना अशा फुटकळ भूखंडाना संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांना वाटप करून देण्यात येते होते. ज्या सहकारी संस्थेकडे फुटकळ भूखंड आहे अशा संस्थेला हा भूखंड देण्यात येत होते. पण या फुटकळ भुखंडामूळे म्हाडाला फक्त अधिमूल्याच्या स्वरुपातच लाभ मिळत होता. हे भूखंड म्हाडाकडून इमारतीच्या पुनर्विकासासाठी फुकट देण्यात येत होते. पण आता या भूखंडाची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे आता म्हाडाला विक्री व अधिमूल्य दुहेरी लाभ मिळणार आहे.

‘मागेल त्याला घर’ या योजनेतून मुंबईत घ्या स्वस्त घर; येथे क्लिक करून पहा म्हाडाच्या ‘या’ योजनेबद्दल माहिती..!

म्हाडाने फुटकळ भूखंडाचे वितरण करण्यासाठी स्वतंत्र ठराव केला आहे. हा ठराव लक्षात घेऊन फुटकळ भूखंडाची व्याख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. हे भूखंड मोफत (Free Plots) मिळत असल्याने इमारत बांधता येईल असे अनेक भूखंड विकासकांकडून ताब्यात घेण्यात येत होते.

अधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्यानंतर असे भूखंड ‘फुटकळ’ दाखविण्यात येत होते. त्यामुळे पुनर्विकासामध्ये विकासकाला (Builder) मोठा फायदा होत होता. रहिवाशांना याचा लाभ अतिरिक्त कार्पेट एरियाच्या रुपात क्वचितच देण्यात येत होता. आता या भूखंडाची (Plots) विक्री करण्यात येणार आहे आणि या भूखंडाची विक्री किंमत आणि कार्पेट एरिया वापरावरील अधिमूल्य देखील आता विकासकाला द्यावे लागणार असल्यामुळे म्हाडाच्या महसुलामध्ये भर पडणार आहे.

मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे क्लिक करून पहा स्वस्त भागांची यादी..!

Leave a Comment