मुंबईकरांनो! म्हाडाची दुकाने तुम्ही पाहिली का? येथे पहा कशी आहेत म्हाडाची दुकाने..!

Mhada Shops Mumbai : मुंबईत हक्काचे घर घ्यायचे असेल किंवा दुकान घ्यायचे असेल तर मुंबईकरांसाठी म्हाडा एक चांगला पर्याय आहे. म्हाडाकडून परवडेल अशा दरात घरे मिळतात. त्यासाठी तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे आता तुम्हाला मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून दुकान (Mhada Shops Mumbai) घेण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाकडून म्हणजेच म्हाडाकडून जवळपास 170 एवढ्या दुकानांचा लिलाव करण्यात येणार आहे. हा दुकानांचा लिलाव मुंबई मंडळाकडून करण्यात येणार आहे. म्हाडाच्या या ई-लिलावामध्ये 9 ते 200 मीटरपर्यंतच्या दुकानांचा समावेश असणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. मुंबईतील म्हाडाची ही दुकाने कशी आहेत? याचा व्हिडिओ देखील खाली दिलेला आहे.

या लिलावाची जाहिरात जानेवारी महिन्याच्या शेवटी निघण्याची शक्यता असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे म्हाडा मुंबई मंडळाच्या दुकानांची बोली रक्कम ही 25 लाखांपासून ते 13 कोटींपर्यंत असल्याचं बोललं जात आहे.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

आता सध्या अनेक मुंबईकरांकडून या दुकानाबद्दल माहिती विचारण्यात येत आहे. म्हाडाच्या या दुकानांची किंमत आणि लोकेशन तसेच हे दुकाने घ्यायचे असेल तर बोली कशी लावली जाते? ही दुकाने कशी आहेत? अशा प्रकारचे प्रश्न सध्या विचारल्या जात आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ पाहू शकता. आर.के.प्रॉपर्टी या युट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे.

दुकानांचा व्हिडीओ पहा (Commercial shops for sale in Mumbai)

या दुकानांची जाहिरात आल्यानंतर इच्छुक असलेले लोकांना या लिलावामध्ये सहभाग घेण्यासाठी ठेव असलेली रक्कम भरून अर्ज करता येऊ शकतो.

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

1 thought on “मुंबईकरांनो! म्हाडाची दुकाने तुम्ही पाहिली का? येथे पहा कशी आहेत म्हाडाची दुकाने..!”

Leave a Comment