मुंबईकरांनो! म्हाडा काढणार 5 हजार 311 घरांची लॉटरी, पहा सविस्तर..!

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या कोंकण मंडळाकडून ठाणे शहर आणि जिल्हा तसेच रायगड, सिंधुदुर्ग, पालघर येथील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत (Housing Schemes) उभारण्यात आलेल्या 5 हजार 311 एवढ्या घरांची लॉटरी (Mhada Lottery) डिसेंबर महिन्याच्या म्हणजेच या महिन्याच्या शेवटी निघण्याची शक्यता आहे. लॉटरीकरिता एकूण 30,687 एवढे अर्ज प्राप्त झाले आहे आणि अनामत रकमेसह 24,303 एवढे अर्ज प्राप्त भरण्यात आले आहे.

या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया 15 सप्टेंबरला सुरू करण्यात आली. अर्जदारांच्या सोयीसाठी म्हणून मुदतवाढ देण्यात आली. प्राप्त झालेल्या अर्जांची प्रारूप यादीही प्रसिद्ध झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 11 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

येथे वाचा – सावध व्हा! चुकूनही विकत घेऊ नका अशी प्रॉपर्टी, अन्यथा वाढतील अडचणी..!

लॉटरीत प्रधामंत्री आवास योजनेअंतर्गत 1 हजार 10 एवढ्या घरांचा समावेश आहे. आणि एकात्मिक गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 1 हजार 37 एवढ्या घरांचा समावेश आहेत. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्याकरिता 67 घरे आहेत. सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919 एवढी घरे आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य ही योजना सोडून इतर सर्व योजनांसाठी 20 टक्के अशी प्रतीक्षा यादी असणार आहे. लॉटरीची नवीन तारीख अर्जदारांच्या मोबाईलवर SMS च्या माध्यमातून सांगितली जाणार आहे.

येथे वाचा – अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करत असलेल्या अर्जदारांना पी.एम.ए.वाय (PMAY) योजनेच्या अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. जर नोंदणी केली नसेल तर यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. कोंकण मंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Aawas Scheme) नोंदणी करण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. ही लॉटरी 13 डिसेंबरला निघणार होती. पण काही प्रशासकीय कारणांमुळे ही लॉटरी पुढे ढकलण्यात आली आहे.

येथे वाचा – मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

Leave a Comment