आता म्हाडाला दादरमध्ये मिळणार घरे; मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होणार?

Mhada Flats Dadar : मुंबईत चांगल्या लोकेशन वर घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण चांगल्या लोकेशन नुसार घरांच्या किंमतीही चांगल्याच असतात म्हणजेच महाग असतात. त्यामुळे मुंबईत मिळेल त्या ठिकाणी परवडणाऱ्या दरातील घर (Affordable Flats Mumbai) शोधले जाते. पण सध्या मुंबईत घरांची मागणी जास्त असल्याने घरांच्या किंमती खूपच वाढल्या आहे. त्यामुळे आता नागरिकांना स्वस्तात घर घ्यायचे असेल तर मुंबईच्या जवळ असलेल्या भागात घरांचा शोध घ्यावा लागत आहे. मुंबई जवळील भागात वन बीएचके घर (1 bhk flat Mumbai) 22 लाखांपासून ते 35 लाखांपर्यंत मिळू शकते. पण आता मुंबई तसेच जवळील भागात म्हाडा तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहे, तेही परवडणाऱ्या दरात. अलीकडेच आलेल्या बातमीनुसार म्हाडाला दादरमध्ये अतिरिक्त घरे (Mhada Flats Dadar) मिळणार आहेत. दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या अवस्थेत असलेला प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

Mhada Flats Dadar

दादरमधील गोखले रोड आणि रानडे रोडवर असलेली R.K बिल्डिंग क्रमांक 1,2 आणि स्वामी समर्थ कृपा बिल्डिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रॉपर्टीच्या भूसंपादनाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. म्हाडाकडून आता अशाच एका प्रकरणामध्ये ही पहिली प्रॉपर्टी भूसंपादित करण्यात येणार असून या जागेवर इमारत बांधण्यात येणार आहे. येथील प्रॉपर्टी व भूखंडाचे क्षेत्र 946.03 चौरस मीटर एवढी आहे. येथे असलेल्या रहिवाशांना इमारतीमध्ये घरे देताना म्हाडाला अतिरिक्त घरांची निर्मिती करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

काय सांगता! आता मुंबईतील या 30 हजार लोकांना मिळणार म्हाडाची घरे, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाने अर्धवट अवस्थेमधील पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याकरिता या प्रकल्पांतर्गत जमिनीच्या भूसंपादनासाठी शासनाची मान्यता मिळावी याकरिता प्रस्ताव सादर केला होता. आता त्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळाली असून रेंगाळलेल्या अवस्थेत असलेल्या पुनर्विकासाचा हा पहिलाच प्रयाेग ठरला आहे. जो पर्यंत इमारतींच्या पुनर्विकासासाठी मालक किंवा रहिवासी पुढे येत नाहीत, तोपर्यंत अशा इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक काळ रेंगाळत राहतो. किंवा काही इमारती विविध कारणांमूळे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असतात, पण आता म्हाडाकडून याप्रकरणी वेगाने कारवाई करण्यात येत आहे.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

अन्यथा बिल्डर किंवा मालकावर कारवाई होईल

जर बिल्डर किंवा मालकाने प्रकल्प अर्धवट अवस्थेत सोडला तर बिल्डर/मालकाला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, असे शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.

आता मुंबईकरांसाठी म्हाडाची नवीन योजना; आता असे होणार घराचे स्वप्न पूर्ण, येथे क्लिक करून पहा महत्वाची अपडेट..!

Leave a Comment