म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; पहा कोणाला मिळणार लाभ?

Mhada Flats : म्हाडाच्या वेगवेगळ्या विभागीय मंडळाच्या सुमारे 11 हजार एवढ्या सदनिकांना सोडतीत (Mhada Flats Lottery) प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांची गेल्या 10 वर्षांपासून विक्रीच झाली नाही. त्यामुळे आता अशा सदनिका भाड्याने देण्याचा विचार म्हाडा करत असून म्हाडाकडून निश्चित करण्यात आलेल्या धोरणामध्ये जे पाच पर्याय आहे, त्यामध्ये सदनिका भाड्याने देण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. म्हणून आता म्हाडा भविष्यामध्ये अश्या विक्री न होऊ शकलेल्या सदनिका तीन वर्षांच्या भाडे तत्वावर देणार आहे.

Mhada Flats

म्हाडाच्या विभागीय मंडळांतील विक्रीअभावी रिक्त असलेल्या सदनिका विक्रीसाठी प्राधिकरणाचे धोरण ठरविण्यासाठी अभ्यास समिती गठित केली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाखाली ही समिती गठित केली आहे. या समितीकडून अभ्यासाअंती सुचविण्यात आलेल्या शिफारशींनुसार धोरण ठरविण्यात आले आहे. आणि त्यानुसार म्हाडाच्या विभागीय मंडळांनी रिक्त असलेल्या सदनिका विक्रीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देखील संजीव जयस्वाल यांच्याकडून देण्यात आले आहे.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

सदनिका भाड्याने देणे. (Mhada Flat Mumbai)

या पर्याया मध्ये खाजगी कंपन्या, शैक्षणिक संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था, सेवाभावी संस्था, हॉस्पिटल, बॅंका यांच्यासाठी त्यांना त्यांच्या मागणीनुसार विक्री न झालेल्या रिक्त सदनिका (Mhada Flats) तसेच व्यवसायिक गाळे भाडे तत्वावर विभागीय मंडळांना वितरित करता येणार आहे. या पर्यायामध्ये वैयक्तिकरित्या सदनिका (Flat) भाडे तत्वावर देऊ नये असे निर्देश देखील देण्यात आले आहे. महत्वाचं म्हणजे सदनिका भाड्याने देण्याचा कालावधी हा 3 वर्षांसाठी ठेवावा लागणार असून त्यामध्ये अजून 3 वर्षांची मुदतवाढ करता येणार आहे. भाडेतत्वावर सदनिका देत असताना सर्वसमावेशक करारनामा करावा लागणार असे नमूद करण्यात आले आहे.

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

Leave a Comment