काय सांगता! म्हाडा विकणार कमी किमतीत 12 हजार घरं, तुम्हाला मिळणार का स्वस्तात घर? पहा बातमी..!

Mhada Flat in Mumbai : महाराष्ट्र राज्यामध्ये म्हाडाची 12,230 घरे (Mhada Flats) विक्री विना तशीच पडून आहेत. सर्व घरांची किंमत बघितली तर 3000 कोटी पेक्षाही अधिक होते. घरांचा वापर होत नसल्याने आर्थिक दृष्ट्या घरांचे नुकसान होत आहे (2 bhk flat in Mumbai). त्यामुळे म्हाडाने या घरांच्या विक्रीसाठी खाजगी संस्थांची मदत घेऊन घरांची किंमत कमी करण्याचे किंवा या घरांच्या विक्रीचे धोरण आखले आहे.

वारंवार म्हाडाच्या सोडतीमध्ये “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या योजनेमध्ये या घरांचा समावेश करूनही घरांची विक्री होत नसल्यामुळे म्हाडासाठी ही एक वेगळीच डोकेदुखी बनली आहे (Mhada Lottery Mumbai). त्यामुळे आता या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या माध्यमातून नवीन धोरण आखले आहे. यामध्ये आता घरांच्या किमती कमी करून या घरांची मोठ्या प्रमाणावर विक्री करणे किंवा खाजगी संस्थांच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये विक्री करणे असे विविध पर्याय यांच्या धोरणात आहे (flat sale in Mumbai). हे धोरण लवकरात लवकर लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हाडा ने घेतला आहे.

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

मुंबई, कोकण तसेच पुणे अशा ठिकाणी म्हाडाच्या घरांना जास्त मागणी आहे. परंतु मागील कित्येक वर्षांपासून ठाणे, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक, नागपूर या ठिकाणी कित्येक घरांची विक्री होत नसल्याची पाहायला मिळाली. यामध्ये काही घरे तर मागील 10 वर्षांपासून तशीच पडून आहेत (3 bhk flat in Mumbai). वारंवार लॉटरी किंवा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा योजनेमध्ये घरांचा समावेश करूनही घरांची विक्री काही झाली नाही.

आता पुण्यात याठिकाणी मिळतायेत सर्वात स्वस्त घरे; येथे क्लिक करून पहा कुठे मिळेल स्वस्त घर..

तसेच मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये सुद्धा घरांची विक्री होत नसल्यामुळे मालमत्ता कर, देखभाल शुल्क, इतर कर इत्यादी अशा सर्वच खर्चाचा भार म्हाडाला सहन करावा लागत असल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी स्वतः या घरांची विक्री करण्यासाठी रणनीती बनवण्याचा निर्णय घेतला. अशावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. या समितीच्या शिफारशी प्रमाणे म्हाडाच्या घरांच्या विक्रीचे धोरण तयार केले. हे धोरण उपाध्यक्षकांकडे मंजुरीसाठी पाठवले. पुढील एक-दोन दिवसांमध्ये या धोरणाला मंजुरी मिळेल अशी दाट शक्यता आहे. अशी महत्त्वाची बातमी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मागील काही वर्षांमध्ये पडून असलेल्या घरांची विक्री करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन धोरणामध्ये विविध पर्यायांचा विचार केला गेला. अशावेळी 2023 च्या सोडतीमध्ये 2015 मध्ये जी घरे बांधली होती त्यांचा देखील समावेश केला. तसेच किमतीमध्ये 2015 पासून 2023 पर्यंतच्या प्रशासकीय खर्चाचा तसेच इतर खर्चाचा यामध्ये समावेश केला. ज्यामुळे घरांच्या किमती आणखी वाढल्या. अशावेळी जास्तीचे शुल्क न आकारता अगदी परवडणाऱ्या दरामध्ये घरांची विक्री करण्याचा प्रयत्न केला जाईल. या घरांच्या ब्लॉक विक्रीसाठी कोणतीही शासकीय संस्था किंवा कोणी पुढे आले असेल तर त्यांच्यासाठी घरांच्या वाटपाचा पर्याय ठेवला आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

तसेच मालमत्ता बाजारपेठेत निवेदनाच्या माध्यमातून घरांची विक्री करणाऱ्या खाजगी संस्थांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातूनच घर विकण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. संस्थेची नियुक्ती झाल्यानंतर घरांच्या विक्रीची पूर्णपणे जबाबदारी संबंधित संस्थेची असेल. ग्राहकांना गृह कर्ज देण्याची जबाबदारी सुद्धा संस्थेवरच असणार आहे. घरांच्या किमतीच्या पाच टक्के रक्कम संस्थेकडे मोबदला म्हणून दिली जाणार आहे. अशी तरतूद या धोरणात आखली आहे.

कारणे काय?

जास्त किमती, शहरांपासून दूर अंतरावर असलेले निवासी प्रकल्प, विविध प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव, तसेच कोणत्याही नियोजनाशिवाय जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी उभारले गेलेले घरांचे प्रकल्प, प्रॉपर्टी तसेच मार्केटचा अंदाज न लावता उभा केलेले प्रकल्प अशा विविध कारणांमुळे ही घरे आतापर्यंत पडून आहेत. अशी माहिती तज्ञांनी व्यक्त केली.

संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

विक्री धोरण असे..

  • घरांच्या किमती कमी करून थेट लिलावाच्या माध्यमातून घरांची विक्री करण्याचा पर्याय.
  • अतिरिक्त शुल्क तसेच प्रशासकीय खर्च या ठिकाणी न आकारता परवडणाऱ्या दरात घरांची विक्री.
  • शासकीय संस्था तसेच इतरांच्या माध्यमातून घरांची विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न.
  • घरांची विक्री करण्यासाठी खाजगी संस्थांची नियुक्ती करण्याचा विचार.

Leave a Comment