MIDC महामंडळाच्या सर्वर वर सायबर हल्ला, 500 कोटींची केली मागणी..!

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची वेबसाइट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे.

महामंडळाच्या कार्यालयातील कंप्यूटर सुरू केल्यानंतर त्यात व्हायरस दिसून येत आहे, अशा परिस्थितीत जर सिस्टम मध्ये प्रवेश केला तर सर्व डाटा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे म्हणुन महामंडळाने आपल्या सर्व कार्यालयांना ऑनलाइन कामकाज बंद करण्याचे आदेश दिले आहे. या मागे नेमका कोणाचा हात आहे, हे अजुन उघड झालेले नाही.

महामंडळाच्या अधिकृत ईमेलवर हॅकर्सने 500 कोटीच्या मागणीचा ईमेल केला आहे. पाचशे कोटी द्या आन्यथा महामंडळाचा सर्व डाटा सार्वजनिक करु किंवा डिलीट करु अशी धमकी महामंडळाच्या ईमेल वर आली आहे.

या सायबर हल्ल्याचा तपास सायबर सुरक्षा यंत्रणा करत आहे. या हल्ल्या मागे भारता बाहेरील व्यक्ती असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. हा खुपच धक्कादायक प्रकार असल्याचं समजतय.

असाच एक हॅकिंग चा प्रकार गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबई मध्ये घडला होता. मुंबई मधील लाईट अचानक गायब झाल्याने हा सायबर हल्ला असल्याची खळबळ उडाली होती. राज्याचे उर्जा मंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचं सांगितलं होतं.

Leave a Comment