आमदार आंबादास दानवे यांची स्टंटगिरी; व्हिडिओ होत आहे प्रचंड व्हायरल..!

औरंगाबाद : सध्या देशा मधील दुसरी लाट ओसरल्यानंतर डेल्टा प्लस ने जोर धरला आहे. डेल्टा प्लस किती धोकायदायक आहे? किंवा लस घेतल्यानंतरही त्याची लागण होते का? याची पुर्णपणे माहिती अजून उपलबध नाही. हे तपासण्यासाठी संशोधन सुरू आहे. डेल्टा प्लसमुळे राज्य शासनाने आज पासून काही निर्बंधही लागू केले आहे. यापार्श्वभुमीवर शहरातील नागरिकांनी संध्याकाळी चार नंतर घरी पोहोचण्यासाठी रस्त्यावर खुपच गर्दी केली होती. यामुळे शहरातील अनेक भागांत वाहतुक कोंडी झाली.

सकाळ पासून सोशल मीडिया वर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेनेचे आमदार आंबादास दानवे एका रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावतांना दिसत आहे. शहरामध्ये सर्वात गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौक येथे काल मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले होते. ही माहिती क्रांती चौक जवळ असलेल्या शिवसेना कार्यालयात पोहोचली. यानंतर ट्राफिक पोलिसांची मदत करण्यासाठी आमदार आंबादास दानवे आपल्या शिवसैनिकांसोबत क्रांती चौक येथे पोहोचले. त्याच दरम्यान एक रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा चालवताना दानवे यांना आढळून आला. तेव्हाच त्यांनी त्याला थांबवून कानशिलात लगावली. (MLA Ambadas Danve’s stunt; The video is going hugely viral)

हा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ अपलोड करत वेगवेगळी caption दिली आहे. अनेकांनी “शिवसेनेच्या नेत्याची स्टंटगिरी” हा caption दिला आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.